पिंपळे गुरव - एका गजबजलेल्या दुपारी, भर उन्हात सहा वर्षांची चिमुकली भेदरलेल्या डोळ्यांनी अनोळखी रस्त्यावर उभी होती. जालन्याच्या पांडे पोखरी गावातून पिंपळे गुरव येथील पारिजात कॉलनीत मामाकडे वास्तूपूजेसाठी आलेली ही चिमुकली खेळता खेळता रस्ता चुकली आणि आपल्या मामा व मामीपासून दुरावली. स्थानिक नागरिक आणि पोलिसांनी तिला धीर देत मामा-मामीकडे सुखरूप सोपविले.