
पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरातील कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. रविवारी सायंकाळी सहा वाजेपर्यंत संपलेल्या चोविस तासात 62 जणांना संसर्ग झाल्याचे आढळले. मात्र, अवघे नऊ जण बरे होऊन घरी गेले. आज आनंदनगर, अजंठानगर, दापोडी, काळेवाडी, पिंपरीगाव, जुनी सांगवी, पाटीलनगर चिखली, फुलेनगर, बालाजीनगर, रहाटणी, वाकड, दळवीनगर, पिंपरी स्टेशन, साईबाबानगर चिंचवड, गवळीनगर भोसरी, पवनानगर येथील व्यक्तींचे तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आलेत.
वायसीएम व भोसरी रुग्णालयातून आज नऊ जणांना डिस्चार्ज देण्यात आला. ते विजयनगर दिघी, धनकवडी, आनंदनगर येथील रहिवासी आहेत. त्यांना चौदा दिवस घरातच राहण्याची सूचना वायसीएम प्रशासनाने केली आहे. मात्र, आनंदनगर चिंचवड येथील 58 वर्षीय व पिंपरीतील रमाबाईनगरमधील 60 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला.
पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
शनिवारी सायंकाळपासून रविवारी सायंकाळी सहा वाजेपर्यंत 62 जणांना संसर्ग झाल्याचे आढळून आले. त्यात 32 पुरुष व 30 महिलांचा समावेश आहे. त्यामुळे शहरातील एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 785 झाली आहे. त्यापैकी 447 जण बरे होऊन घरी गेले आहेत. तर, 324 जणांवर उपचार सुरू आहेत. आजपर्यंत 14 जणांचा मृत्यू झाला आहे.
पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
दरम्यान, पावसाळा सुरू झालेला असल्याने नागरिकांनी अत्यावश्यक कारणाशिवाय घराबाहेर पडू नये. पावसामुळे मास्क ओला होणार नाही, याची काळजी घ्यावी. तसेच सोबत किमान एक अतिरिक्त मास्क ठेवावा, असे आवाहन अतिरिक्त वैद्यकीय अधिकारी डॉ. पवन साळवे यांनी केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.