esakal | कोरोना निर्बंधांना लघुउद्योजकांचाही विरोध; औद्योगिक क्षेत्रासाठीच्या अटींचा होतेय त्रास
sakal

बोलून बातमी शोधा

Industry

औद्योगिक क्षेत्रासाठी सरकारने घातलेल्या अटी आणि त्याचा उद्योजकांना होणारा त्रास, उत्पादनावर झालेला परिणाम याविषयी लघुउद्योजकांनी आपली भूमिका मांडली आहे. 

कोरोना निर्बंधांना लघुउद्योजकांचाही विरोध; औद्योगिक क्षेत्रासाठीच्या अटींचा होतेय त्रास

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पिंपरी : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर घातलेल्या निर्बंधांना व्यापारी वर्गातून मोठा विरोध आहे. आता उद्योजकांनीही नाराजीचा सूर लावला आहे. ऑक्सिजन पुरवठ्यापासून कामगारांच्या लसीकरणांपर्यंत साऱ्यांना अनेक अडचणींशी सामना करावा लागतोय, असे त्यांचे म्हणणे आहे. औद्योगिक क्षेत्रासाठी सरकारने घातलेल्या अटी आणि त्याचा उद्योजकांना होणारा त्रास, उत्पादनावर झालेला परिणाम याविषयी लघुउद्योजकांनी आपली भूमिका मांडली आहे. 

- देशभरातील बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

प्रश्न : सध्या ऑक्सिजनची गरज आरोग्य विभागाला आहे. यावर पर्याय काय? 
उत्तर : महापालिका औद्योगिक क्षेत्रात ११ हजार उद्योग आहेत. यापैकी ७० टक्के उद्योगांना औद्योगिक वापरासाठी ऑक्सिजनची गरज लागते. पिंपरी-चिंचवड औद्योगिक परिसरात शंभर टन क्षमतेचा ऑक्सिजन प्रकल्प उभारण्याची मागणी पिंपरी-चिंचवड लघुउद्योग संघटनेने मागील लॉकडाउन कालावधीत केली होती. परंतु, अद्याप हा प्रकल्प उभारलेला नाही. रुग्णांचा ऑक्सिजन कमी करावा, असे उद्योजकांचे अजिबात म्हणणे नाही. मात्र, उद्योगांना लागणाऱ्या ऑक्सिजन पुरवठ्यासाठी १० एप्रिलपर्यंत परवानगी घेणे बंधनकारक केले आहे. या कालावधीत ते शक्य होणार नाही. म्हणून मुदत १५ एप्रिलपर्यंत करावी. तसेच, नवीन १०० टन क्षमतेचा प्रकल्प तातडीने उभारावा. जेणेकरून उद्योग व आर्थिक चक्र सुरूच राहील. 
- पुणे शहर आणि जिल्ह्यातील बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
प्रश्‍न : बाजारपेठा, दुकाने बंदमुळे कोणत्या अडचणींना सामोरे जावे लागते? 
उत्तर : उद्योजकांना औद्योगिक कारणासाठी विविध प्रकारचा कच्चा माल लागतो. उदाहरणार्थ- वेल्डिंग साहित्य, नट, बोल्ट, ऑइल, स्टील. याचा पुरवठा करणारे घाऊक व किरकोळ व्यापारी यांची दुकाने सहा एप्रिलपासून बंद केल्याने उद्योगांना लागणारा कच्चा माल व इतर साहित्य बाजारात मिळेनासे झाले आहे. उद्योजकाची आर्थिक परिस्थिती बेताचीच असल्याने तो कच्चा माल व इतर साहित्याचा साठा करू शकत नाही. औद्योगिक परिसरातील ७० टक्के उद्योग हे घाऊक व किरकोळ व्यापाऱ्यांकडून दररोज खरेदी करत असतात. परंतु, आता माल मिळत नाही. पर्यायाने उद्योग बंद करण्याची वेळ आली आहे. त्यामुळे दुकाने सुरू ठेवण्यासाठी स्थानिक प्रशासनाने परवानगी द्यावी. 
- देशभरातील बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
प्रश्न : कामगारांच्या लसीकरणासाठी काय करता येईल? 
उत्तर : महापालिका कार्यक्षेत्रात एमआयडीसी भोसरी, चिंचवड, पिंपरी तसेच सेक्टर ७ व १०, शांतिनगर, गुळवेवस्ती, आनंदनगर, चिखली, पवार वस्ती, कुदळवाडी, नवणेवस्ती, शेलारवस्ती ज्योतिबानगर, तळवडे आदी औद्योगिक क्षेत्राचा समावेश होतो. येथे सूक्ष्म, लघु व मध्यम अशा उद्योगात साडेचार लाख कामगार आहेत. सध्या महापालिकेच्या कोरोना चाचणी केंद्रांमधील नमुन्यांचा रिपोर्ट मिळण्यास दोन दिवसांचा कालावधी लागतो. मात्र, प्रशासनाने १० एप्रिलपर्यंत कोरोना चाचणी करणे बंधनकारक केले आहे. इतक्या कमी वेळेत साडेचार लाख कामगारांची चाचणी करणे शक्य नाही. त्यामुळे चाचणीची मुदत वाढवून द्यावी. तसेच, एमआयडीसी कार्यक्षेत्रात काही ठिकाणी लसीकरण केंद्रे सुरू करावीत.

loading image