पिस्तूल काढून सॉफ्टवेअर इंजिनिअरला धमकावलं अन्...

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 30 August 2020

रस्त्याने पायी जाणाऱ्या सॉफ्टवेअर इंजिनिअरला पिस्तूलाचा धाक दाखवून त्यांच्याकडील सोनसाखळी हिसकावल्याची घटना पिंपळे सौदागर येथे घडली.

पिंपरी : रस्त्याने पायी जाणाऱ्या सॉफ्टवेअर इंजिनिअरला पिस्तूलाचा धाक दाखवून त्यांच्याकडील सोनसाखळी हिसकावल्याची घटना पिंपळे सौदागर येथे घडली. याप्रकरणी दोन अज्ञातांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

जसवंत कुमार अगरवाल (वय 42, रा. राजवीर पॅलेस, फेज 1, पिंपळे सौदागर) यांनी फिर्याद दिली. फिर्यादी सॉफ्टवेअर इंजिनिअर असून, शनिवारी (ता. 29) रात्री पावणेदहाच्या सुमारास ते जेवण करून शतपावली करण्यासाठी घराबाहेर पडले. गोविंद गार्डन चौकातून पी. के. चौकाकडे जाणारा पूल ओलांडून पिंपळे सौदागर येथे आले असता दोन अनोळखी व्यक्ती त्यांच्याजवळ आल्या. 

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

पिस्तूलाचा धाक दाखवून त्यांच्याकडील पन्नास हजार रुपये किमतीची सोनसाखळी हिसकाविली. याप्रकरणी सांगवी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल असून, अधिक तपास सुरू आहे. परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासून आरोपींचा शोध घेतला जात आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: snatched gold chain from engineer through pistol in pimple saudagar