वाकड, ताथवडेतील रस्त्यांच्या विषयावरून महापालिका सत्ताधारी भाजपमध्ये फूट 

bjp_121.jpg
bjp_121.jpg

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेत भारतीय जनता पक्षाची सत्ता आहे. मात्र, पक्षाचे माजी शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप, विद्यमान शहराध्यक्ष महेश लांडगे आणि निष्ठावंत गट अशा तीन गटात पक्षाची विभागणी झाली असल्याचे बोलले जात आहे. त्यातल्या त्यात जगताप व लांडगे गटातील नगरसेवकांची संख्या अधिक आहे. त्यातील मतभेदांची प्रचिती आज स्थायी समिती सभेत आली. कारण, वाकड-ताथवडे प्रभाग 25 मधील नवीन चार रस्त्यांच्या विकासावरून दोन्ही गट आमने-सामने झाले. विशेष म्हणजे सदर विषयांच्या मंजुरीसाठी शिवसेनेचे गटनेते राहुल कलाटे तीव्र इच्छुक होते. त्यांना लांडगे गटाच्या नगरसेवकांनी साथ दिल्याने चारपैकी दोन विषय पाच विरुद्ध आठ मतांनी मंजूर झाला. अन्य दोन विषय तहकूब ठेवण्यात आले. 

वेगळा प्रयोग: कर्जमाफीसाठी थेट कारागृहात जाऊन केले आधार प्रमाणीकरण 

स्थायी समिती सभापती संतोष लोंढे यांच्या अध्यक्षतेखाली आज सभा झाली. त्यात दोन नगरसेवक ऑनलाइन सहभागी झाले. वाकड- ताथवडेतील नवीन रस्त्यांचा प्रस्ताव महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी मांडला होता. गेल्या सभेत चारही प्रस्ताव तहकूब ठेवण्यात आले होते. आजच्या सभेत जगताप समर्थक नगरसेवकांनी चारही विषय फेटाळून लावण्याची मागणी केली. तर, कलाटे यांनी नागरिकांच्या सोयीसाठी रस्ते महत्त्वाचे असल्याने ते विषय मंजूर करावेत, अशी भूमिका घेतली. त्यावरून दोन्ही बाजूकडून मतप्रदर्शन झाले. सभापती लोंढे यांनी, विषय तहकूब ठेवण्याची भूमिका घेतली. मात्र, जगताप समर्थक विषय फेटाळून लावण्याच्या भूमिकेवर ठाम राहिल्याने मतदान घेण्याचे ठरले. अखेर दोन विषय तहकूब ठेवून दोन विषयांवर मतदान झाले. त्यात कलाटे यांना लांडगे समर्थक नगरसेवकांनी साथ दिल्याने पाच विरुद्ध आठ मतांनी विषय मंजूर करण्यात आले. त्यावरून भाजपमध्ये फूट पडल्याचे उघड झाले. 

रेल्वे स्थानक विस्तारिकरणासाठी 110 कोटीचा प्रस्ताव

ताथवडेतील गाडा रस्ता आणि वाकडमधील काळा खडक ते उड्डाणपूल रस्ता हे दोन्ही विषय तहकूब ठेवण्यात आले. ताथवडे व वाकड गावांच्या हद्दीवरील रस्ता आणि ताथवडेतील इंदिरा कॉलेज शनी मंदिर ते मारुंजीगाव यांना जोडणाऱ्या दोन रस्त्यांवर मतदान घेण्यात आले. 16 सदस्यांच्या स्थायी समितीचे अध्यक्षपद लांडगे समर्थक लोंढे यांच्याकडे आहे. मतदानात 13 सदस्यांनी सहभाग घेतला. कलाटे यांच्या भूमिकेला राष्ट्रवादी व भाजपच्या प्रत्येकी तीन नगरसेवकांनी साथ दिली. मतदानाने दोन विषय मंजूर झाल्यानंतर जगताप समर्थक पाच नगरसेवकांनी सभात्याग केला. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com