पिंपरी - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या माध्यमिक शाळांचा यावर्षी निकाल ९३ टक्के लागला आहे. यात माध्यमनिहाय महापालिकेच्या मराठी माध्यमाचा ९३.८२ तर उर्दू माध्यमाचा ९६.०२ निकाल लागला आहे. गतवर्षी ९५.३६ टक्क्यांच्या तुलनेत दोन टक्क्यांनी निकाल घटला आहे. १८ विद्यार्थी लाखाचे मानकरी ठरले आहेत.