ST Strike : कधी-कधी शिळे अन्न खाऊनच दिवस काढतो | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कधी-कधी शिळे अन्न खाऊनच दिवस काढतो

ST Strike : कधी-कधी शिळे अन्न खाऊनच दिवस काढतो

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पिंपरी : आम्ही कधी-कधी शिळे अन्न खाऊनच दिवस काढतो. दहा हजार पगार वडीलांच्या हातात येतो. वडीलांच्या पगारात घरखर्चही भागत नाही. नोकरीच्या वेळांमुळे वडील घरातून जातात कधी अन् घरी येतात कधी हे देखील समजत नाही. कुटुंबात चार सदस्य आहेत. दरमहिन्याला हात उसने पैसे घेऊन घर चालवावं लागतं. वडीलांच्या पगारात घरखर्च भागत नाही, म्हणून माझी आई घरकाम करते. शाळेचे शुल्क थकले आहे.

आमच्या कुटुंबीयांचा विचार करून तरी एसटी महामंडळाचे विलीनीकरण शासनामध्ये करावं. अन्यथा आमचं जगणंच मुश्कील होईल, अशी भावना वल्लभनगर आगारात बस चालक असलेल्या बाळासाहेब नागरगोजे यांचा मुलगा संदीप नागरगोजे याने कुटुंबाची व्यथा कथन केली.

loading image
go to top