कोरोना टेस्ट केलीये? रिपार्ट मिळाला नाही? मग, निरामयमध्ये राहा!

संसर्ग रोखण्यासाठी पिंपरी चिंचवड महापालिकेचा निर्णय
कोरोना टेस्ट
कोरोना टेस्टTeam Esakal

पिंपरी : ''तुम्हाला सर्दी, खोकला आहे. ताप येतोय. कोरोनाची लक्षणे दिसताहेत. त्यामुळे आरटीपीसीआर टेस्ट केली आहे. पण, रिपोर्ट आलेला नाही.'' त्यामुळे तुम्ही समाजात फिरून संसर्ग वाहक ठरू शकतात. आता यातून सुटका होणार आहे. कारण, तपासणी केल्यानंतर रिपोर्ट येईपर्यंत चिंचवड स्टेशन येथील निरामय रुग्णालयात उपचारांची सुविधा महापालिकेने उपलब्ध करून दिली आहे. कोरोना संसर्ग साखळी खंडित करण्यासाठी महापालिका विविध उपाययोजना करीत आहे. त्याअंतर्गत काही निर्णय घेतले आहेत, अशी माहिती महापालिका आयुक्त राजेश पाटील यांनी दिली. ते म्हणाले, ''सध्या रेमडेसिव्हिर इंजेक्शनचा तुटवडा जाणवत आहे. मात्र महापालिका रुग्णालयात पुरेसे इंजेक्शन उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न सुरू आहे. तसेच, व्हेंटिलेटरचीही कमतरता आहे. मात्र, लवकरच महापालिकेसह खासगी रुग्णालयांतही व्हेंटिलेटर बेडची संख्या वाढवण्यात येणार आहे.

कोरोना टेस्ट
प्रवाशांनो, पुणे स्टेशनवर विनाकारण गर्दी करू नका

येत्या दहा दिवसात सहाशे व्हेंटिलेटर बेड उपलब्ध होतील. ज्या रुग्णांना कुठलीही लक्षणे नाहीत. मात्र संसर्ग झालेला आहे, अशा रुग्णांनी होम आयसोलेटवर भर द्यावा. अशा रुग्णांच्या मार्गदर्शनासाठी महापालिकेने कॉल सेंटर सुरू केले आहे. या रुग्णांशी कॉल सेंटरमधील कर्मचारी संपर्क साधून त्यांना सल्ला देतील. तसेच वेळप्रसंगी डॉक्टरही संवाद साधतील. ऑक्सीजन व बेड व्यवस्थापनावर नियंत्रण ठेवण्यासाठी महापालिकेचे यंत्रणा कार्यरत आहे. संसर्गाची साखळी खंडित करण्यासाठी नियमांचे पालन करावे व प्रशासनाला सहकार्य करावे.''

कोविड सदृष्य रुग्णालय

कोरोनाची लक्षणे असलेल्या व्यक्ती किंवा ज्यांची टेस्ट झाली आहे. परंतु रिपोर्ट आलेले नाहीत, अशा व्यक्तींना रिपोर्ट येईपर्यंत रुग्णालयात दाखल केले जाणार आहे. यासाठी चिंचवड स्टेशन येथील निरामय हॉस्पिटल महापालिकेने अधिग्रहीत केले आहे आहे. रिपोर्ट आल्यानंतर पॉझिटिव्ह की निगेटिव्ह ते बघून पुढील निर्णय घेतला जाणार आहे.

कोरोना टेस्ट
पुणे मार्केटयार्डमधील गर्दीला बसणार वेसण; ओळखपत्राशिवाय 'नो एन्ट्री'

खासगीतील आयसीयू रुग्ण स्थलांतर नाही

संसर्ग झालेले काही रुग्ण महापालिकेच्या रुग्णालयांतील आयसीयू कक्षात (अतिदक्षता विभाग) दाखल आहेत. तर काही रुग्ण खासगी रुग्णालयांच्या आयसीयूमध्ये उपचार घेत आहेत. येथील काही रुग्णांना महापालिकेच्या रुग्णालयात दाखल केले जाते. परंतु, अशा वेळी रुग्ण दगावण्याची शक्यता असते. शिवाय, महापालिका रुग्णालयातही आयसीयू बेडची कमतरता आहे. त्यामुळे यापुढील काळात फक्त महापालिका रुग्णालयात दाखल रुग्णांनाच आयसीयूमध्ये दाखल केले जाणार आहे. खाजगी रुग्णालयातील अतिदक्षता विभागातील रुग्णांना महापालिकेच्या अतिदक्षता विभागामध्ये भरती केले जाणार नाही.

स्टेप डाउन केअर सेंटर बालेवाडी

महापालिकेच्या वायसीएम, जम्बो सेंटर, ऑटोक्लस्टर अशा रुग्णालयांमध्ये अनेकजण उपचार घेतात. त्यानंतर त्यांना अलगीकरणाची आवश्यकता असते. अशा रुग्णांना टप्प्याटप्प्याने सामान्य स्थितीत आणावे लागते. अशा व्यक्तींसाठी बालेवाडी येथील कोविड केअर सेंटरमध्ये दीडशे बेडची व्यवस्था करण्यात आलेली आहे.

नियम न पाळणार्‍या रुग्णालयावर कारवाई महापालिकेने शहरातील १०१ खाजगी रुग्णालयांना कोविड केअर सेंटर म्हणून मान्यता दिलेली आहे. मात्र अशा रुग्णालयांकडून बेड संख्येबाबत वेळोवेळी माहिती दिली जात नाही. तसेच काहींकडून नियमांचे पालन केले जात नाही. अशा रुग्णालयांना महापालिका आयुक्त राजेश पाटील यांनी लेखी ताकीद दिलेली आहे. प्रसंगी कारवाईही करण्यात येणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com