पिंपरी-चिंचवड : 'पथविक्रेता, फेरीवाल्यांनो आत्मनिर्भर योजनेचा लाभ घ्या'

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 19 September 2020

  • पथविक्रेता, फेरीवाल्यांना महापालिका नागरी वस्ती विभागाचे आवाहन 

पिंपरी : कोरोना व लॉकडॉउनमुळे फेरीवाले व पथविक्रेत्यांच्या उपजीविकेवर परिणाम झाला आहे. त्यांना पुन्हा व्यवसाय सुरू करण्यासाठी खेळते भांडवल मिळवून देण्यासाठी केंद्र सरकारने प्रधानमंत्री पथविक्रेता आत्मनिर्भर निधी योजना सुरू केली आहे. त्याची अंमलबजावणी सुरू झाली असल्याचे महापालिका नागरवस्ती विकास योजना समाज विकास अधिकारी संभाजी ऐवले यांनी सांगितले. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

योजनेची उद्दिष्टे 

- पथविक्रेत्यांना सहाय्य म्हणून 10 हजार रुपये कर्ज स्वरूपात देणे 
- नियमित परतफेड करण्यास प्रोत्साहन देणे 
- डिजीटल व्यवहारात प्रोत्साहन देणे 
- लाभार्थी पात्रता निकष मार्च 2020 पूर्वीचे पथ विक्रेते 
- महापालिकेचे विक्री प्रमाणपत्र किंवा ओळखपत्र असावे 
- महापालिका सर्वेक्षणात आढळलेले मात्र, विक्री प्रमाणपत्र किंवा ओळखपत्र न दिलेले 
- सर्वेक्षणात वगळलेले किंवा सर्वेक्षणानंतर व्यवसाय सुरू केलेले मात्र, महापालिकेचे पथविक्रेता शिफारसपत्र असलेले 
- आसपासच्या भागातील मात्र महापालिकेचे शिफारस पत्र असलेले 

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

लाभाचा तपशील 

- नगरविक्रेता एक वर्षाच्या परतफेड मुदतीसह 10 हजार रुपयांचे खेळते भांडवल कर्ज घेण्यास व त्याची दरमहा हप्त्याने परतफेड करण्यास पात्र असतील. 
- कर्जावर रिझर्व्ह बॅंकेच्या प्रचलित दराप्रमाणे व्याजदर लागू राहील 
- विहित कालावधीत कर्ज परतफेड केल्यास सात टक्के व्याज अनुदान मिळविण्यास पात्र. 
- डिजीटल माध्यमातून व्यवहार केल्यास कॅशबॅक सुविधेस पात्र 
- पथविक्रेता कर्ज अर्ज http//:pmsvanidhi.mohua.gov.in या वेबसाईटद्वारे करणे 
- सीएफसी केंद्र यांच्याद्वारे अर्ज करू शकतात 
- आधार कार्ड व आधार कार्ड संलग्न मोबाईल क्रमांक आवश्‍यक 
- महापालिकेने दिलेले पथविक्रेता प्रमाणपत्र 
- निवडणूक ओळखपत्र 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

महापालिका हद्दितील जास्तीत जास्त फेरीवाले आणि पथविक्रेत्यांनी त्यांच्या सामाजिक व आर्थिक कल्याणाच्या दृष्टीने योजनेचा लाभ घ्यावा. योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी जवळच्या नागरी सुविधा केंद्रात तत्काळ संपर्क साधावा.
- संभाजी येवले, नागरवस्ती विकास योजना समाज विकास अधिकारी 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: street vendors, peddlers take advantage of self-reliance scheme in pimpri chinchwad