Video : पिंपरी कॅम्प बंदचे आदेश आहेत, तरी काल दुकाने सुरू होती अन् आज...

टीम ई सकाळ
रविवार, 28 जून 2020

महापालिकेच्या वतीने पिंपरी कॅम्प परिसरातील दुकाने बंद ठेवण्याचा आदेश दिलेला असतानाही अनेक दुकाने शनिवारी सुरू होती.

पिंपरी : महापालिकेच्या वतीने पिंपरी कॅम्प परिसरातील दुकाने बंद ठेवण्याचा आदेश दिलेला असतानाही अनेक दुकाने शनिवारी सुरू होती. त्याबद्दलचे वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर रविवारी (ता. 28) मात्र, कडक बंद ठेवण्यात आला. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप   

पिंपरी कॅम्प परिसरात कोरोनाच्या रुग्णांचे प्रमाण वाढत होते. काही व्यावसायिक ग्राहक सोशल डिस्टन्सिंग, मास्क लावणे यासारख्या नियमांचे पालन करताना दिसत नसल्याचे महापालिका प्रशासनाच्या निदर्शनास आले होते. या नियमांचे पालन करण्याबाबत अनेकदा आवाहन करण्यात येऊनही काही फरक पडत नव्हता. त्यामुळे शुक्रवार (ता. 26), शनिवार (ता. 27) आणि रविवार (ता. 28) असे तीन दिवस हे पुन्हा कॅम्प परिसर बंद ठेवण्याचा आदेश महापालिका प्रशासनाला द्यावा लागला. 

पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

यासंदर्भात पिंपरी कॅम्पाची पाहणी केली असता बहुतेक दुकाने बंद होती. भाजीमंडईच्या परिसरातील केवळ एक-दोन दुकाने उघडी होती. कॅम्पातून अपवादात्मक नागरिक रस्त्यावरुन फिरताना दिसत होते. काही छोट्या व्यावसायिकांनी दुकानाच्या बाहेर दैनंदिन वापराचे किरकोळ कपडे रस्त्यावरच विक्री करण्यास सुरवात केली. सोमवारसाठी महापालिका काय निर्णय घेते याकडे व्यापारी, नागरिकांचे लक्ष लागले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Strictly closed in Pimpri Camp