Pimpri News : आर्थिक विवंचनेतून मेट्रो स्थानकावरून उडी मारून विद्यार्थ्याने जीवन संपविले

आर्थिक विवंचनेतून एका विद्यार्थ्यांने पिंपरीतील संत तुकारामनगर मेट्रो स्थानकावरून रस्त्यावर उडी मारून जीवन संपविले.
student end life
student end lifesakal
Updated on

पिंपरी - आर्थिक विवंचनेतून एका विद्यार्थ्यांने पिंपरीतील संत तुकारामनगर मेट्रो स्थानकावरून रस्त्यावर उडी मारून आत्महत्या केली. ही घटना सोमवारी (दि. २४) सायंकाळी सातच्या सुमारास घडली.

सुजल संजय मनकर (वय-२१, रा. राजगुरुनगर) असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. पिंपरी ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अशोक कडलग यांनी दिलेली माहिती अशी, सुजल मनकर हा पिंपरीतील एका महाविद्यालयात बीसीएस अभ्यासक्रमाच्या शेवटच्या वर्षात शिक्षण घेत होता. त्याची घरची आर्थिक परिस्थिती हलाखीची होती.

त्याने सोमवारी सायंकाळी संत तुकारामनगर मेट्रो स्थानकावर प्लॅटफॉर्मवर प्रवेश केला. तेथील एका डक्टमधून त्याने थेट खाली रस्त्यावर उडी मारली. यामध्ये गंभीर जखमी झाल्याने परिसरातील नागरिकांनी त्याला उपचारासाठी तातडीने महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.

सुजल याने आर्थिक विवंचनेतून आत्महत्या केल्याचे समोर येत असून अधिक तपास सुरू असल्याचे कडलग यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com