खेळाडू, एनसीसी विद्यार्थ्यांना वाढीव गुणांसाठी या तारखेपर्यंत मुदत

खेळाडू, एनसीसी विद्यार्थ्यांना वाढीव गुणांसाठी या तारखेपर्यंत मुदत

पिंपरी : माध्यमिक शालांत (इयत्ता 10वी) आणि उच्च माध्यमिक (12 वी) प्रमाणपत्र परीक्षेला 2019-20 मध्ये बसणारे खेळाडू आणि एनसीसी, स्काऊट गाईडमधील विद्यार्थ्यांना सवलतीचे वाढीव गुण मिळण्याबाबत राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने 20 जूनपर्यंत मुदत दिली आहे. 

इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षांना बसणाऱ्या खेळाडू, एनसीसी छात्र आणि स्काऊट गाईडच्या विद्यार्थ्यांना सवलतीचे वाढीव गुण देण्यासाठी डिसेंबर 2018 मध्ये सुधारित नियमावली प्रसिद्ध केलेली आहे. त्याला अनुसरुन, संबंधित खेळाडू आणि विद्यार्थ्यांनी 1 जानेवारी ते 5 एप्रिलपर्यंत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयांना क्रीडा गुण सवलत मिळण्यासाठीचे प्रस्ताव सादर करण्याची मुदत देण्यात आली होती. मात्र, याच काळात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढल्याने खेळाडू आणि विद्यार्थ्यांना त्यांच्या वाढीव गुणांचे प्रस्ताव सादर करण्यात आले नव्हते. त्यामुळे, 20 मेपर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. परंतु, त्यातही खेळाडू वाढीव क्रीडा गुणांपासून वंचित राहण्याची शक्‍यता असल्याने महाराष्ट्र ऍथलेटिक्‍स असोसिएशनचे अध्यक्ष ऍड. अभय छाजेड यांनी शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांच्यासमवेत पत्रव्यवहार आणि प्रत्यक्ष बोलणी केली.

पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

त्यानुसार, हे प्रस्ताव सादर करण्यासाठी आता 20 जूनपर्यंतची मुदत निश्‍चित करण्यात आली आहे, असे पुणे जिल्हा हौशी ऍथलेटिक्‍स संघटनेचे सुमंत वाईकर यांनी कळविले आहे. जिल्हा क्रीडा अधिकारी विजय संतान यांनीही त्याला दुजोरा दिला. संतान म्हणाले, "लॉकडाऊनच्या काळामुळे सुमारे दीड महिन्यापर्यंत वाढीव क्रीडा गुणांसाठी वेळोवेळी यापूर्वी मुदतवाढ देण्यात आली आहे. मात्र, 20 जून ही शेवटची संधी राहील. त्यामुळे, खेळाडू आणि विद्यार्थ्यांनी त्याबाबतचे प्रस्ताव वेळेत सादर करावेत.''

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com