पिंपरी : परदेशी जाणाऱ्या विद्यार्थ्यांना आज पहिला डोस व दुसरा डोस मिळणार

पिंपरी चिंचवड शहरामधील रहिवासी असलेल्या वय वर्षे १८ व त्यापुढील उच्च शिक्षणासाठी परदेशी जाणाऱ्या विद्यार्थ्यांना पहिला डोस व दुसरा डोस मिळणार आहे.
Corona Vaccine Dose
Corona Vaccine DoseSakal

पिंपरी - पिंपरी चिंचवड शहरामधील (Pimpri Chinchwad City) रहिवासी असलेल्या वय वर्षे १८ व त्यापुढील उच्च शिक्षणासाठी (High Education) परदेशी जाणाऱ्या विद्यार्थ्यांना (Student) पहिला डोस (Dose) व दुसरा डोस मिळणार आहे. शनिवारी (ता. २४) नवीन जिजामाता रुग्णालयात सकाळी दहा ते सायंकाळी पाच या वेळेत लसीकरण करण्यात येणार आहे. (Students Going Abroad will Get the First Dose and the Second Dose Today)

या लाभार्थ्यांसाठी २०० लस उपलब्ध आहे. लसीकरणाला येताना परदेशी विद्यापीठ प्रवेश मिळाल्याचे निश्चितीपत्र आणि परदेशी व्हिसा, व्हिसा मिळण्यासाठी संबंधित विद्यापीठाकडून प्राप्त झालेले I-२० किंवा DS-१६० From (Admission confirmation letter and I-20 or DS-160 Form for Foreign Visa from concerned overseas university etc.), मुलाखत / रोजगारासाठी परदेशी जात असणाऱ्या नागरीकांना ऑफर पत्र तसेच टोकियो ऑलिम्पिकमध्ये भाग घेण्यासाठी नामांकन याबाबतचे पत्र असलेले खेळाडू व त्यांचे प्रशिक्षक यांना या कागदपत्रांच्या पुराव्यासह घेउन यावेत आहे. लसीकरण केंद्रावर पहिला डोस व दुसरा डोस हा पहिल्या डोसनंतर २८ दिवस झालेल्या लाभार्थ्यांचे लसीकरण करण्यात येणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com