PCMC News : भक्कम बूथ रचनेमुळेच गुजरातमध्ये यश - पालकमंत्री चंद्रकांत पाटील

भारतीय जनता पार्टीने गुजरातमध्ये बूथ रचना भक्कम केल्याने तेथे पक्षाला घवघवीत यश मिळविले आहे.
Chandrakantdada Patil
Chandrakantdada PatilSakal
Summary

भारतीय जनता पार्टीने गुजरातमध्ये बूथ रचना भक्कम केल्याने तेथे पक्षाला घवघवीत यश मिळविले आहे.

भोसरी - भारतीय जनता पार्टीने गुजरातमध्ये बूथ रचना भक्कम केल्याने तेथे पक्षाला घवघवीत यश मिळविले आहे. त्यामुळे पिंपरी-चिंचवडमधीलही कार्यकर्त्यांनी बूथ रचना भक्कम करण्याचे आवाहन पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी भोसरीत कार्यकर्यांना केले.

भोसरीतील दिघी रस्त्यावरील मतदान केंद्रामध्ये येणाऱ्या बूथ प्रमुखांबरोबर संवाद साधताना ते बोलत होते. या वेळी भाजपचे पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष आमदार महेश लांडगे, पश्चिम महाराष्ट्र संघटक मकरंद देशपांडे, पुणे जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे, पुणे शहराध्यक्ष जगदीश मुळीक, पिंपरी-चिंचवड सरचिटणीस व शक्ती बूथप्रमुख विजय फुगे, चिंचवड विधानसभा प्रभारी शंकर जगताप, एकनाथ पवार, अमोल थोरात, सदाशिव खाडे, राजू दुर्गे, नंदू दाभाडे, अर्जून ठाकरे, माजी नगरसेवक राजेंद्र लांडगे, भीमाबाई फुगे आदींसह बूथ प्रमुख व कार्य़कर्ते उपस्थित होते.

पालकमंत्री पाटील पुढे म्हणाले, 'भोसरीतील शक्ती बूथमधील प्रत्येकाने किमान तीस मतदार कार्यकर्त्यांना निवडावेत जेणेकरून त्यांना भाजपचा टिळा लावता येईल. जे बूथ प्रमुख तीस कार्यकर्ते तयार करतील, त्यांच्या घरी पंधरा दिवसांनी चहा पिण्यासाठी येणार आहे आणि मी दिलेला शब्द शंभर टक्के पाळतो.'

शक्ती बूथप्रमुख विजय फुगे म्हणाले, 'पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील हे शब्द पाळणारे आहेत. त्य़ामुळे पिंपरीत झालेल्या शाई फेकीनंतरही ते भोसरीतील बूथ प्रमुखांशी संवाद साधण्य़ासाठी आल्याने बूथ प्रमुखांचा उत्साह वाढला आहे.'

दरम्यान पिंपरीत पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर शाई फेकण्याच्या झालेल्या प्रकारामुळे भोसरीतील दिघी रस्ता, भोसरी-दिघी रस्ता चौक, पीएमटी चौक, पुणे-नाशिक महामार्गाचा सेवा रस्ता आदी भागांवर पोलिसांचा चोख बंदोबस्त होता. त्यामुळे परिसराला पोलिस छावणीच स्वरूप प्राप्त झाले होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com