
मानसिक स्थिती ठीक नसलेल्या एका व्यक्तीने उड्डाणपुलावरून उडी मारून आत्महत्या केली. ही घटना आज रविवारी (ता. 10) सकाळी अकरा वाजताच्या सुमारास चिंचवडगावात घडली.
पिंपरी - मानसिक स्थिती ठीक नसलेल्या एका व्यक्तीने उड्डाणपुलावरून उडी मारून आत्महत्या केली. ही घटना आज रविवारी (ता. 10) सकाळी अकरा वाजताच्या सुमारास चिंचवडगावात घडली.
- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
कैलास महाजन (वय 40, रा. वाल्हेकरवाडी, चिंचवड) असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. महाजन यांची मानसिक स्थिती काही दिवसापासून ठीक नव्हती. एकटे बडबड करीत एकटेच फिरायचे. दरम्यान, रविवारी सकाळी चिंचवडगावातील चाफेकर चौकातून जुना जकात नाक्याकडे जाणाऱ्या उड्डाणपुलावर जाऊन त्यांनी खाली उडी मारली. यामध्ये गँभीर जखमी झाल्याने त्यांना उपचारासाठी तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या मागे पत्नी व दोन मुली आहेत. चिंचवड पोलिस अधिक तपास करीत आहेत.
Edited By - Prashant Patil