MLA Sunil Shelke : ‘टेकओव्हर’ झालेल्या कंपन्यांमध्ये जुन्या कामगारांना संधी द्यावी; आमदार सुनील शेळके यांची अधिवेशनात मांडणी
Workers Rights : मावळचे आमदार सुनील शेळके यांनी औद्योगिक वसाहतींमधील कंपन्यांचे स्वामित्व हस्तांतरण करतांना जुन्या कामगारांचा नव्या व्यवस्थापनात समावेश व्हावा, अशी मागणी केली आहे.
तळेगाव दाभाडे : ‘‘औद्योगिक वसाहतींमधील कंपन्यांचे स्वामित्व हस्तांतरण (टेकओव्हर) होत असताना, तेथील जुन्या कामगारांनाही नव्या व्यवस्थापनात सामावून घेतले पाहिजे,’’ अशी मागणी मावळचे आमदार सुनील शेळके यांनी केली आहे.