esakal | Pimpri : स्वच्छ भारत स्वच्छ विद्यालय शिक्षकांचे आज प्रशिक्षण
sakal

बोलून बातमी शोधा

Pimpri : स्वच्छ भारत स्वच्छ विद्यालय शिक्षकांचे आज प्रशिक्षण

Pimpri : स्वच्छ भारत स्वच्छ विद्यालय शिक्षकांचे आज प्रशिक्षण

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पिंपरी : ‘स्वच्छ भारत स्वच्छ विद्यालय’अंतर्गत जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, (डीआयईटी) पुणे व महापालिका शिक्षण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आज (ता. ६) ‘मासिक पाळी व्यवस्थापन’ (एमएचएम) या विषयावर केंद्रस्तरीय ऑनलाइन प्रशिक्षण आयोजित केले आहे, अशी माहिती प्राथमिक शिक्षण विभागचे उपआयुक्त संदीप खोत यांनी दिली.

मानव संसाधन विकास मंत्रालय भारत सरकारने ‘स्वच्छ भारत स्वच्छ विद्यालय’ राष्ट्रीय अभियान २०१७ पासून सुरू केलेले आहे. या अभियानाचा एक भाग म्हणून मासिक पाळी व्यवस्थापनाकडे लक्ष वेधले आहे. शहरातील सर्व माध्यम व सर्व व्यवस्थापन, प्राथमिक व माध्यमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापकांनी यात सहभाग घ्यायचा आहे.

सकाळी ११ ते दुपारी ४ या वेळेत https://youtu.be/HOj92UbWXv4 या युट्यूब व झूम ॲपच्या माध्यमातून सरळ प्रक्षेपनद्वारे आयोजित केले आहे. प्रत्येक शाळेमधील इयत्ता सहावी ते आठवी या वर्गांना अध्यापन करणाऱ्या सर्व महिला शिक्षिकांनी या ऑनलाइन प्रशिक्षण वर्गास पूर्णवेळ उपस्थित राहणे अनिवार्य आहे. या केंद्रस्तरावरील प्रशिक्षणार्थी पुढे शाळास्तरावर विद्यार्थ्यांना प्रशिक्षण द्यायचे आहे. त्यामुळे शिक्षिकांनी पूर्णवेळ उपस्थित राहणे बंधनकारक असल्याची सूचना उपआयुक्त खोत यांनी केली आहे.

loading image
go to top