तळेगाव स्टेशन - रोजचे अपघात आणि वाहतूक कोंडीमुळे गेल्या कित्येक वर्षांपासून चर्चेत असलेल्या तळेगाव-चाकण-शिक्रापूर महामार्गाच्या समस्यांची जंत्री बुधवारी अखेर विधानभवनाच्या पायऱ्यांवर पोहोचली..महाराष्ट्र विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरु असताना चाकणमध्ये होत असलेल्या जन आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मावळचे आमदार सुनील शेळके, खेड आळंदीचे आमदार बाबाजी काळे, शिरुर हवेलीचे आमदार ज्ञानेश्वर कटके यांच्यासह विधानपरिषदेचे आमदार सचिन अहिर यांनी तळेगाव-चाकण-शिक्रापूर रस्त्याची झालेली दयनीय अवस्था आणि वाढत्या अपघातांत जाणारे सामान्य जनतेचे बळी अधोरेखित करुन विधानभवनाच्या पायऱ्यांवर भूमिका घेत निदर्शने केली. 'अपघात थांबवा, आमचे जीव वाचावा' असे फलक हातात घेऊन घोषणा देत या आमदारांनी सरकारचे लक्ष वेधले..विधानभवनाच्या प्रवेशद्वारावर प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना मावळचे आमदार सुनील शेळके म्हणाले कि, राज्य आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून तळेगाव-चाकण-शिक्रापूर उन्नत महामार्गाच्या कामाची ३,२०० कोटींची निविदा प्रक्रिया सुरु आहे.प्रस्तावित उन्नत महामार्गाची निविदा प्रक्रिया पूर्ण होण्यास किमान तीन चार महिने लागतील तसेच प्रत्यक्ष काम होण्यास किमान दोन अडीच वर्षे लागणार आहे. दिवसाकाठी हजारो वाहने या रस्त्यावरुन ये जा करतात. या रस्त्यावरुन जाताना जीव मुठीत धरुन प्रवास करावा लागतो..अनेक गोरगरीब ,सर्वसामान्यांचे निष्पापांचे बळी जात आहे. तोपर्यंत सरकार आणि संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांनी अस्तित्वातील रस्त्याची डागडुजी, साईडपट्ट्यांचे मुरमीकरण करणे, अपघात प्रवण ठिकाणी सूचना फलक लावणे आणि खड्डे दुरुस्ती प्रशासनाने तातडीने करावी असे आमदार शेळके म्हणाले.खेड आळंदीचे आमदार बाबाजी काळे म्हणाले कि, तळेगाव चाकण शिक्रापूर रस्ता तसेच नाशिक फाटा ते खेड रस्ता गेली अनेक वर्षे निविदा प्रक्रियेच्या विळख्यात अडकला आहे. अतिक्रमणे काढून खड्डे न बुजवल्याने अनेक निष्पापांचे बळी जात आहेत. त्याविरोधात सर्वसामान्यांचे मोठे जन आंदोलन उभे राहिले आहे..उन्नत महामार्गाचे काम सुरु होईपर्यंत अस्तित्वातील रस्तयांची देखभाल करुन वाहतूक पोलिसांची संख्या वाढवावी. तळेगाव चाकण शिक्रापूर रस्त्यावरील रहदारीचा ताण कमी करण्यासाठी शिरुर कर्जत पनवेल उरण हा पर्यायी रस्ता देखील लवकरात लवकर व्हावा अशी मागणी देखील आमदार काळे यांनी केली.अशी मागणी शिरुर हवेलीचे आमदार ज्ञानेश्वर कटके म्हणाले कि, सरकारकडून निधीची तरतूद करण्यात आली असली तरी या रस्त्याच्या कामाची निविदा प्रक्रिया थांबली आहे. एमआयडीसीला जोडणारे हे रस्ते अरुंद असल्यामुळे अनेकांचे बळी जात आहेत. भूसंपादन आणि निविदा प्रक्रियेला राज्य शासनाने गती द्यावी आणि सर्वसामान्यांना दिलासा देण्याचे काम करावे. प्रस्तावित रिंगरोड आणि पर्यायी मार्गांचे कामही प्राधान्याने होणे गरजेचे असल्याचे आमदार कटके म्हणाले..राष्ट्रीय महामार्ग-५४८डी बाबत दैनिक सकाळचा सातत्याने पाठपुरावातळेगाव-चाकण-शिक्रापूर या तत्कालीन राज्य मार्ग क्रमांक -५५ वर २०१५ मध्ये टोलमुक्ती झाल्यानंतर या मार्गाच्या दुरुस्ती देखभालीला कुणी वालीच उरलेला नाही. गेल्या दशकभरात सार्वजनिक बांधकाम विभाग, विशेष प्रकल्प विभाग, भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण आणि शेवटी महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळ (एमएसआयडीसी) असा हस्तांतरणाच्या टोलवाटोलवीत देखभालीकडे कमालीचे दुर्लक्ष झाल्याने ५४ किलोमीटरचा हा रस्ता अक्षरक्ष: खिळखिळा होऊन मृत्यूचा सापळा बनला आहे..अपघात,वाहतूक कोंडी आणि बळींचे वाढते प्रमाण अधोरेखित करत या रस्त्याच्या कोंडीत अडकलेल्या सर्वसामान्यांच्या व्यथा मांडून दैनिक सकाळने हा रस्ता कायम राज्यकर्ते आणि प्रशासनाच्या दृष्टीक्षेपात ठेवण्याचा प्रयत्न केला आहे.समस्यांच्या विळख्यात अडकलेल्या तळेगाव-चाकण-शिक्रापूर रस्त्याला राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा मिळाल्यापासून ते नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या उन्नत महामार्गाच्या निविदेपर्यंत सुरु असलेला दैनिक सकाळचा पाठपुरावा या महामार्गाचे काम पूर्ण होईपर्यंत सातत्यपूर्वक सुरुच राहणार आहे..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.