
तळेगाव दाभाडे : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची चाहूल लागली आहे. त्यामुळे राजकीय हालचाली आणि मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. प्रामुख्याने तळेगाव दाभाडे, लोणावळा या दोन्ही नगर परिषद, वडगाव नगर पंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद तसेच ग्रामपंचायतींसाठी इच्छुकांकडून वेगवेगळ्या क्लृप्त्या अवलंबवल्या जात आहेत.