
तळेगाव दाभाडे : वडगाव-तळेगाव-चाकण फाटा मार्गावरील छत्रपती संभाजी महाराज चौक म्हणजेच वडगाव-तळेगाव फाटा चौकातील वाहतूक कोंडी दिवसेंदिवस वाढत आहे. या चौकात उड्डाणपूल, भुयारी मार्ग, सीसीटीव्ही, वाहतूक नियंत्रक दिवे (सिग्नल) यापैकी एकही सुविधा नाही. त्यामुळे दररोज आणि सतत वाहतूक कोंडी होत आहे. येथे नियंत्रक दिवे बसविण्यासाठी गेल्या दोन वर्षांपासून वडगावनगर पंचायत आणि आयआरबी कंपनी एकमेकांकडे बोट दाखवत आहे.