
तळेगाव दाभाडे : तळेगाव फाटा चौक दररोज आणि दिवसभर सतत कोंडीत अडकलेला असतो. चारही दिशांनी येणारी हजारो वाहने, हॉर्नचा आवाज, धरामुळे वाढलेले प्रदूषण, उन्हात वैतागलेले प्रवासी ही येथील रोजची कहाणी. इतके सारे अनर्थ केवळ येथे वाहतूक नियंत्रक दिवे (सिग्नल) नसल्याने घडत आहेत. यासाठी जबाबदार असलेले प्रशासकीय अधिकारी तब्बल ३६ महिन्यांपासून एकमेकांकडे बोट दाखवत आहेत. सिग्नल बसवण्यासाठी पोलिस, नगरपंचायत आणि आयआरबी कंपनी यांच्यात टोलवाटोलवी सुरूच आहे.