Mcoca Crime : तळेगांव व रावेत परिसरातील कीटक भालेराव, रामा पाटील टोळीवर मोका

तळेगाव दाभाडे परिसरातील जय उर्फ कीटक भालेराव आणि रावेत परिसरातील रामा पाटील या दोन टोळ्यांवर मोका नुसार कारवाई करण्यात आली.
MCOCA Crime
MCOCA Crimeesakal

पिंपरी - तळेगाव दाभाडे परिसरातील जय उर्फ कीटक भालेराव आणि रावेत परिसरातील रामा पाटील या दोन टोळ्यांवर मोका (महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी प्रतिबंध अधिनियम) नुसार कारवाई करण्यात आली आहे. अपर पोलीस आयुक्त वसंत परदेशी यांनी याबाबतचे आदेश दिले आहेत.

टोळी प्रमुख जय उर्फ कीटक प्रवीण भालेराव (वय १९, रा. म्हाडा कॉलनी, तळेगाव दाभाडे), टोळीतील सदस्य ऋतिक उर्फ दाद्या पोपट मेटकरी (वय २२, रा. देहूरोड), विशाल शिवाजी गुंजाळ (वय १८, रा. तळेगाव दाभाडे), प्रदीप ज्ञानोबा वाघमारे (वय २२, रा. वडगाव मावळ), वैभव रामकृष्ण विटे (वय २५, रा. तळेगाव दाभाडे) आणि एक अल्पवयीन मुलगा यांच्या विरोधात कारवाई करण्यात आली आहे.

तळेगाव दाभाडे परिसरातील जय उर्फ कीटक भालेराव आणि त्याच्या पाच साथीदारांवर खुनाचा प्रयत्न, दरोडा, सदोष मनुष्यवध करण्याचा प्रयत्न करणे, गंभीर दुखापत, दुखापत, विनयभंग, खंडणी मागणे, बेकायदेशीर हत्यार तसेच अग्निशस्त्र बाळगणे, बेकायदेशीर जमाव जमवून खुनाचा प्रयत्न करणे, तोडफोड करणे असे १३ गंभीर गुन्हे दाखल आहेत.

टोळी प्रमुख रामा परशुराम पाटील (वय २९, रा. थेरगाव), टोळीतील सदस्य प्रदीप उर्फ पांडुरंग लहू सुतार (वय २२, रा. रहाटणी), नीरज रवींद्र आडाणे (वय २३, रा. मुदखेड, नांदेड) यांच्या विरोधात कारवाई करण्यात आली आहे.

रावेत परिसरातील रामा पाटील आणि त्याच्या दोन साथीदारांवर गंभीर दुखापत, दरोडा, खंडणी, जबरी चोरी, कट रचणे, बेकायदेशीर जमाव जमवून सदोष मनुष्यवध करण्याचा प्रयत्न करणे, बेकायदेशीर घातक शस्त्रे बाळगणे, चोरी करणे, चोरीचा माल घेणे असे नऊ गंभीर गुन्हे दाखल आहेत.

कारवाई करण्यात आलेल्या गुन्हेगारांनी टोळी बनवून हिंसाचाराचा वापर करून वर्चस्वासाठी व आर्थिक फायद्यासाठी संघटितपणे गुन्हे केले असल्याचे निष्पन्न झाल्याने त्यांच्यावरही कारवाई करण्यात आली आहे.

पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, सह पोलीस आयुक्त डॉ. संजय शिंदे, अपर पोलीस आयुक्त वसंत परदेशी, पोलीस उपायुक्त स्वप्ना गोरे, डॉ. काकासाहेब डोळे, सहायक आयुक्त बाळासाहेब कोपनर यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण सावंत, सत्यवान माने, शिवाजी गवारे, पोलीस अंमलदार सचिन चव्हाण, व्यंकप्पा कारभारी, अमित गायकवाड, विकास तारू यांनी ही कारवाई केली.

शहरातील १९६ गुन्हेगारांवर मोका कारवाई

शहरातील गुन्हेगारीवर नियंत्रण आणण्यासाठी पिंपरी चिंचवड पोलिसांनी जानेवारी ते जुलै या सात महिन्यांच्या कालावधीत १८ टोळ्यांमधील १९६ गुन्हेगारांवर मोका (महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी प्रतिबंध अधिनियम) अन्वये कारवाई केली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com