esakal | पिंपरी-चिंचवड : शिक्षकांना मिळेना कोरोना प्रोत्साहन भत्ता 
sakal

बोलून बातमी शोधा

पिंपरी-चिंचवड : शिक्षकांना मिळेना कोरोना प्रोत्साहन भत्ता 

कोरोना संसर्ग काळात काम केलेल्या महापालिकेतील सर्वच विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रतिदिन दीडशे रुपयांचा प्रोत्साहन भत्ता देण्यास मान्यता मिळाली आहे.

पिंपरी-चिंचवड : शिक्षकांना मिळेना कोरोना प्रोत्साहन भत्ता 

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पिंपरी : कोरोना संसर्ग काळात काम केलेल्या महापालिकेतील सर्वच विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रतिदिन दीडशे रुपयांचा प्रोत्साहन भत्ता देण्यास मान्यता मिळाली आहे. इतर कर्मचाऱ्यांना तो दिवाळीमध्येच भत्ता देण्यात आला. मात्र शिक्षक विभाग आणि वैद्यकीय विभागाच्या समन्वयांच्या अभावामुळे 65 दिवसांचा लॉकडाउनचा कालावधी पूर्ण केलेल्या शिक्षकांना अद्याप प्रोत्साहन भत्ता मिळालेला नाही. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

महापालिका नियमित आणि अत्यावश्‍यक सेवेतील सर्वच अधिकारी व कर्मचाऱ्यांनी जोखीम पत्करून कामावर हजर होते. कोविड केअर सेंटरमध्ये अनेकांनी वेळेचे बंधन न पाळता काम केले आहे. सेवेसाठी व सुरक्षितेतसाठी आवश्‍यक त्या उपाययोजना व खर्च करण्याची तरतूद असल्याने स्थायी समितीने ठराव केला. त्यानुसार 24 मार्च ते 17 मे, 14 जुलै ते 23 जुलै या दरम्यान महापालिकेच्या सर्वच कर्मचाऱ्यांना प्रत्यक्ष केलेल्या कामाच्या प्रमाणात हजर दिवसांप्रमाणे प्रतिदिन 150 रूपये प्रोत्साहन भत्ता मंजूर करण्यास मान्यता दिली आहे. दिवाळीच्या कालावधीत बहुतांश कर्मचाऱ्यांना भत्ता देण्यात आला. मात्र, मार्चपासून सुमारे तीनशे शिक्षकांनी दिवसरात्र काम केले आहे. त्यांच्याकडे शिक्षक विभाग आणि वैद्यकीय विभागाकडून विविध कागदपत्रांची मागणी करण्यात येत आहे. हजेरीपत्रक, मुख्याध्यापकांचे शिफारस पत्र, कार्यमुक्त अहवालाची मागणी करण्यात येत असल्याने शिक्षक त्रासले आहेत. वैद्यकीय विभागाकडून अहवाल न आल्याने शिक्षक विभागाकडून भत्ता देण्याची कार्यवाही करण्यात येत नसल्याचे शिक्षकांनी सांगितले. 

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

प्राथमिक पदवीधर संघाचे अध्यक्ष मनोज मराठे म्हणाले, "शिक्षक विभाग आणि वैद्यकीय विभागात संदिग्धता असल्याने शिक्षक अद्याप प्रोत्साहन भत्तापासून वंचित आहेत. आता भत्त्यासाठी विविध कागदपत्रांची जमवाजमव करण्यासाठी शिक्षकांची धावपळ होत आहे. त्यामुळे अनेक शिक्षकांनी कागदपत्रे जमा करण्यास रस दाखवित नाहीत.'' 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

"प्रत्येक प्रभागांमधील रूग्णालयातील डॉक्‍टरांच्या टीमकडून त्यांच्या कामाची माहिती मिळणे आवश्‍यक आहे. त्यांच्या रिपोर्टनुसार भत्ता मिळण्याची कार्यवाही होऊ शकते.'' 
- डॉ. पवन साळवे, अतिरिक्त वैद्यकिय अधिकारी 

"कोरोना ड्युटीवरील शिक्षकांची यादीची फाइल वैद्यकीय विभागाकडे सुपूर्द पाठवली आहे.'' 
- ज्योत्सना शिंदे, प्रशासन अधिकारी, शिक्षण विभाग

loading image