Wakad News : काळाखडक येथील वासियांचे किवळेत तात्पुरते स्थलांतर! उभारण्यात आले ट्रांझिट कॅम्प

काळाखडक झोपडपट्टी वाशियांसाठी शासनाच्या झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाकडून पुनर्वसन प्रकल्प राबविण्यात येत आहे.
Temporary Relocation of Kalakhadak Residents to Kiwale
Temporary Relocation of Kalakhadak Residents to Kiwalesakal
Updated on

- बेलाजी पात्रे

वाकड - येथील काळाखडक झोपडपट्टी वाशियांसाठी शासनाच्या झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाकडून पुनर्वसन प्रकल्प राबविण्यात येत आहे. रहिवाशांच्या वास्तव्यासाठी महापालिका प्रशासनाच्या परवानगीने किवळेत तात्पुरते भव्य संक्रमण शिबिर (ट्राझिट कॅम्प) राबविण्यात आले असून रहिवासी उत्स्फूर्तपणे कॅम्पमध्ये स्थलांतरित होत आहेत.

किवळेतील ११ हजार ६६४ चौरस मीटर इतक्या प्रशस्त संक्रमण शिबिरास महापालिका प्रशासनाने रीतसर परवानगी दिली आहे. २४ तास वीज, मुबलक पाणी, ड्रेनेज ह्या अत्यावश्यक सेवांसह सर्व सुख-सुविधांचा अंतर्भाव ह्या कॅम्पमध्ये आहे.

मात्र, काही राजकारणी स्वतःच्या आर्थिक स्वार्थापोटी आजूबाजूच्या सोसायटी धारकांत हा कॅम्प बेकायदा असल्याचा गैरसमज पसरवून प्रकारणाला वेगळे वळण देत आहेत. आम्हा नागरिकांना येथे वास्तव्य करण्यास विरोध करून गरीब-श्रीमंत असा संघर्ष उभा केला जात असल्याचा आरोप रहिवाशांनी प्रसिद्ध पत्रकाद्वारे केला आहे.

या देशाचा नागरिक आणि एक माणूस म्हणून जगण्याचा आणि कुठेही राहण्याचा अधिकार सर्वांना आहे. मात्र, काही सोसायटीधारक आणि राजकारणी माणसा-माणसात जाणीवपूर्वक भेद निर्माण करत आहेत. आम्ही आर्थिकदृष्ट्या गरीब असलो तरी वैचारिक पातळीने अतिशय परिपक्व आहोत. झोपडपट्टीतील रहिवाशांत अनेकजण विविध क्षेत्रात चांगल्या पदावर कार्यरत आहेत. त्यामुळे गैरसमज आणि भुलथापांना बळी पडू नका अशी विनंती पत्रकाद्वारे केली आहे.

एवढ्या तिरस्काराची भाषा का ?

तुमची धुणी-भांडी करतो, सुरक्षित प्रवासासाठी वाहनचालकही आम्हीच, तुमच्या लहान मुलांचे पालन-पोषण-सांभाळह करतो, जेवण बनवतो साफसफाई-बागकाम अन सुरक्षारक्षक बनून तुमचे रक्षणही करतो. एवढेच काय तर तुमच्या श्वानांचे मलमूत्र देखील काढतो.

मग तुमच्या जवळ राहण्याचा अधिकार आम्हाला नाही का? आमच्या गरीबीचा इतका तिरस्कार का? असा सवाल काळाखडकवाशियांनी सोसायटी धारकांना विचारत आमचा मुक्काम तात्पुरता आहे पुनर्वसन होताच आम्ही हक्काच्या घरात परत जाऊ असा भावनिक वचननामा त्यांनी जाहिर केला आहे.

असा विरोध असेल तर शहरातील झोपडपट्ट्यांचे पुनर्वसन कसे होणार? प्रकल्प पुर्ण करण्यासाठी तात्पुरते संक्रमण गरजेचे असते. सामाजिक सलोखा आणि संविधानाची भाषा करताना संविधानातील समता आणि बंधुता याचाच विसर काहींना पडला आहे. गरीब-श्रीमंत भेदभाव करणे अत्यंत चुकीचे आहे.

- बाळासाहेब पाटोळे, रहिवासी काळाखडक

आमच्या कामधंद्याची गैरसोय होत असताना मनावर दगड ठेवून तात्पुरत्या संक्रमणात राहण्यासाठी आम्ही आलोय. किवळेतील पुढारी, सोसायटीधारक व इतर कार्यकर्ते आम्हाला हीन वागणूक देत असतील तर घटनेने दिलेल्या जगण्याच्या अधिकाराची अवहेलनाच आहे.

- सत्यभामा लष्करे, रहिवासी काळाखडक

२० वर्षांपासून बालाजी कॉलेज शेजारी झोपडपट्टी आहे. मात्र, आजवर महिला छेडछाडीची साधी एक तक्रार सुद्धा नाही. पुनर्वसन इमारत पूर्ण होईपर्यंत संक्रमण शिबिरात वास्तव्यास जाण्याची मुभा शासन नियमावलीत आहे. प्रकल्प महाराष्ट्र शासन व पिंपरी चिंचवड महापालिकेचा आहे. शासनापेक्षा कोणीही मोठे नाही. शासनाने कायद्याच्या आणि नियमांच्या अधीन राहुनच शिबिराला परवानगी दिली आहे.

- अलका धनवडे, रहिवासी, काळाखडक

एसआरए प्रकल्प राबविण्यासाठी शासन नियमांच्या अधीन राहून हे तात्पुरते संक्रमण केले आहे. मात्र, पुढाऱ्यांनी आपल्या मताच्या ध्रुवीकरणासाठी काळाखडकाला बदनाम करण्याचे षडयंत्र रचले. आम्ही रहिवासी एवढ्या खालच्या पातळीचे नाही आहोत. आम्ही इथे येण्याने चोऱ्या, गुन्हेगारी आणि छेडछाडीच्या घटनात वाढ होणार असल्याचे अपमानजनक वक्तव्य काहिंनी केले. ते अतिशय निंदनीय आहे.

- किशोर खंडागळे, सदस्य काळाखडक रहिवासी संघ

मी कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नसताना चुकीची व खोटी माहिती प्रसारित केली जात आहे. हे अतिशय चुकीचे आहे. त्याबाबत आमचे जनसंपर्क अधिकारी कायदेशीर उत्तर देतीलच. तक्रार येताच कारवाईसाठी आमचे पथक गेले होते मात्र, संक्रमण शिबिरास परवानगी असल्याचे मला वरिष्ठांनी सांगितले होते. रीतसर माहिती बांधकाम परवाना विभागाकडून मिळेल.

- अमित पंडित, सहाय्यक आयुक्त

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com