esakal | चिखलीत थरार! भरदिवसा तरुणाचा निर्घृण खून
sakal

बोलून बातमी शोधा

Murder

चिखलीत थरार! भरदिवसा तरुणाचा निर्घृण खून

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पिंपरी : कोयत्याने वार करीत डोक्यात दगड घालून तरुणाचा खून केल्याची घटना चिखलीतील मोरेवस्ती येथे रविवारी (ता.११) दुपारी घडली. कानिफनाथ क्षीरसागर (रा. पिंपरी) असे खून झालेल्याचे नाव आहे. कानिफनाथ हे त्यांच्या मुलासोबत रविवारी सकाळी चिखली परिसरात आले होते. ते साने कॉलनी रोडने जात असताना हल्लेखोराने कानिफनाथ यांच्या डोक्यात हत्याराने वार केले. त्यानंतर डोक्यात दगड घातला. यामध्ये गंभीर जखमी झाल्याने त्यांचा मृत्यू झाला.

भरदिवसा हा प्रकार घडल्याने परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. हल्लेखोर कोण आहेत, कोणत्या कारणातून घटना घडली, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. आरोपींच्या शोधासाठी पोलिस पथके रवाना केली आहेत. अधिक तपास सुरू आहे.

loading image