esakal | घरात भूत असल्याचे सांगत महिलेला दिले अगरबत्तीचे चटके
sakal

बोलून बातमी शोधा

घरात भूत असल्याचे सांगत महिलेला दिले अगरबत्तीचे चटके

घरात भूत असल्याचे सांगत महिलेला दिले अगरबत्तीचे चटके

sakal_logo
By
मंगेश पांडे

पिंपरी : घरात भूत आहे, पौर्णिमच्या आत मरून जाणार , असे सांगत महिलेवरून लिंबू उतरवले. मारहाण करीत अगरबत्तीचे चटके दिले. तसेच महिलेला चाकूचा धाक दाखवत पैसे उकळून कुटुंबाला जिवे मारण्याची धमकी दिली. हा प्रकार दिघी येथे घडला. (The woman threatened to kill the family with a knife and looted money)

या प्रकरणी पीडित महिलेने फिर्याद दिली आहे. त्यानुसार गौरव गणपत भोईर (वय १९, रा. नेवासा फाटा, अहमदनगर), ऍशली जोसेफ, तुषार या तिघांवर गुन्हा दाखल झाला आहे. फिर्यादीला एक वर्षापासून बरे वाटत नाही. बाहेरची करणी झाल्याचे वाटत असल्याने त्यांनी बहिणीचा मुलगा गौरव याला सांगितले. त्यानंतर गौरव त्याचा मित्र जोसेफ व तुषार याना घरी घेऊन आला.

हेही वाचा: पुणे पालिकेवर आता २५० टन कचऱ्याचा जादा भार

हेही वाचा: भाजपचे आमदार कोर्टात गेले तरी काही उपयोग नाही- छगन भुजबळ

फिर्यादीच्या घरात भूत आहे, पौर्णिमेच्या आत मरतील असे जोसेफ व तुषार यांनी सांगून फिर्यादीला घरातील हॉलमध्ये बसवले. त्यांच्या आजूबाजूला हळद-कुंकू टाकून तुषार याने त्यांना पट्ट्याने मारून जखमी केले. तर जोसेफने फिर्यादीच्या शरीरावरुन लिंबू उतरवून त्यांच्या जिभेला व ओठांना अगरबत्तीचे चटके दिले. त्यांच्याकडून ३५ हजार रुपये घेतले. त्यानंतरही वारंवार फोन करून पैशांची मागणी केली. १ जुलैला जोसेफ याने फिर्यादीच्या घरी येऊन चाकूचा धज दाखवून एक हजार रुपये जबरदस्तीने घेतले व कुटुंबाला जिवे मारण्याची धमकी दिली. दिघी पोलिस अधिक तपास करीत आहेत.

loading image