Video : नाट्यगृहांवर आलेला हा सगळ्यात वाईट काळ, पिंपरी-चिंचवडमधील स्थितीचा घेतलेला आढावा

टीम ई सकाळ
सोमवार, 29 जून 2020

उन्हाळी सुटीच्या कालावधीत नाट्यगृहांमध्ये सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल असते.

पिंपरी : उन्हाळी सुटीच्या कालावधीत नाट्यगृहांमध्ये सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल असते. त्यामुळे महापालिकेच्या उत्पन्नातदेखील भर पडते. यंदाच्या वर्षी आलेल्या कोरोनाच्या संकटामुळे शहरातील नाट्यगृहांना चार महिन्यांच्या कालावधीत महापालिकांच्या या नाट्यगृहांना 50 लाख रुपयांचा फटका सहन करावा लागला आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप   

मार्च ते जून या चार महिन्यांच्या कालवधीमध्ये चिंचवडमधील प्रा. रामकृष्ण मोरे नाट्यगृह, भोसरीतील अंकुशराव लांडगे नाट्यगृह आणि सांगवीमधील निळू फुले नाट्यगृह या तीन ठिकाणी मोठ्या प्रमाणात नाटके, सेमिनार, शैक्षणिक कार्यकम, गॅदरिंग, ऑक्रेस्ट्रा अशा कार्यक्रमांचे आयोजन होत असते. यावर्षी मार्च महिन्याच्या अखेरीस कोरोनाचे संकट वाढल्यामुळे राज्यात सर्वत्र लॉकडाउन लावण्यात आला. त्यामुळे तेव्हापासून बंद झालेली नाट्यगृहे आजतागायत सुरु झालेली नाहीत. 

दरम्यान, गेल्यावर्षी मार्च ते जून 2019 या चार महिन्यांच्या कालावधीत या तिन्ही नाट्यगृहांना 51 लाख 80 हजार 635 रुपयांचे उत्पन्न मिळाले होते. त्यामध्ये सर्वाधिक कार्यक्रम हे प्रा. रामकृष्ण मोरे नाट्यगृहामध्ये झाले होते. त्यामुळे चार महिन्यात त्यांना 21 लाख 95 हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले. भोसरीमधील अंकुशराव लांडगे नाट्यगृहाला या कालावधीत 16 लाख 69 हजार 370 तर सांगवीमधील निळू फुले नाट्यगृहाला 13 लाख 16 हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले होते. 

पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

परिस्थिती सुधारण्यास वेळ लागणार... 

कोरोना आटोक्‍यात येण्यास अजून काही काळ लागणार आहे. त्यामुळे लॉकडाउन हळूहळू शिथिल होत असला, तरी शहरातील नाट्यगृहे सुरु होण्यासाठी रसिकांना अजून काही काळ वाट पाहावी लागणार आहे. नाट्यगृहे सुरु झाल्यानंतर त्याठिकाणी निर्बंध राहाण्याची शक्‍यता आहे. दरम्यान, राज्य सरकारने पुन्हा एकदा लॉकडाउन वाढवला असल्यामुळे नाट्यगृहे कधी सुरु होण्यासाठी कोरोना जाण्याची वाट पाहावी लागणार आहे. 

शहरातील नाट्यगृहांना गेल्यावर्षी उन्हाळ्यात मिळालेले उत्पन्न (रुपयांमध्ये)

अंकुशराव लांडगे नाट्यगृह, भोसरी

 • मार्च : 7,23,320 
 • एप्रिल : 3,52,011 
 • मे  : 2, 58, 513 
 • जून : 3, 36, 526

रामकृष्ण मोरे नाट्यगृह, चिंचवड 

 • मार्च : 7,50,667 
 • एप्रिल : 3,60,326 
 • मे  : 4,13,206 
 • जून  : 6,70,974 

निळू फुले नाट्यगृह, सांगवी

 • मार्च : 2,02,653 
 • एप्रिल : 3, 09,375 
 • मे : 3,52,911 
 • जून  : 4, 51,153 

एकूण : 51, 80, 635 रुपये 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: theaters loss income due to corona at pimpri chinchwad