esakal | हिंजवडीत एकाच रात्रीत पाच दुकाने फोडली
sakal

बोलून बातमी शोधा

हिंजवडीत एकाच रात्रीत पाच दुकाने फोडली

हिंजवडीतील विनोदे वस्ती येथे चोरट्यांनी मेडिकल, मोबाईल दुकानासह एकाच रात्रीत पाच दुकाने फोडली.

हिंजवडीत एकाच रात्रीत पाच दुकाने फोडली

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पिंपरी : हिंजवडीतील विनोदे वस्ती येथे चोरट्यांनी मेडिकल, मोबाईल दुकानासह एकाच रात्रीत पाच दुकाने फोडली. यामध्ये 83 हजारांचा ऐवज लंपास केला. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

विशाल विलास निकम (रा. ईलाईट होम सोसायटी शेजारी, निकम हाऊस, विनोदेवस्ती) यांनी फिर्याद दिली. फिर्यादी यांच्या मोबाईलच्या दुकानाचा पाठीमागील पत्रा उचकटून आत शिरलेल्या चोरट्याने दुकानातील चार मोबाईल व बॅगेतील रोकड, असा एकूण 29 हजार 200 रूपयांचा ऐवज लंपास केला. यासह त्यांच्या दुकानाशेजारील मेडिकलचे शटर उचकटून दोन हजारांची रोकड चोरली. येथीलच लक्ष्मी चौकातील दुकानाचे शटर उचकटून गल्ल्यातील तीन हजारांची रोकडही चोरट्यांनी लंपास केली. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

मारूंजी-कासारसाई रोडवरील एका हॉटेलचा दरवाजा व काच तोडून 40 हजार रुपये किमतीचे इन्व्हर्टर व दोन बॅटऱ्या चोरल्या. बेंगलोर-मुंबई महामार्गावरील एका वाईन शॉपचा दरवाजा तोडून काच फोडली. या पाचही घटनांमध्ये 83 हजार 200 रुपयांचा माल व रोकड चोरट्यांनी लंपास केली. या घटना मंगळवारी रात्री आठ ते बुधवारी सकाळी दहाच्या सुमारास घडल्या. हिंजवडी पोलिस अधिक तपास करीत आहेत.