
पिंपरी : परस्पर संवादासाठी एकत्र येण्यासाठी आता हॉल शोधा, त्याच्यासाठी द्यावयाच्या शुल्काच्या रकमेसाठी घासाघीस करायची गरज नाही. तसेच हाच हॉल का घेतला, तो का नाही घेतला, अशा मुद्यांवर संबंधितांमध्ये होणारे वादही थांबले आहेत. कारण वेबिनार, फेसबुक लाईव्ह, विविध ऍप्स अशा संस्था, संघटनांच्या मदतीला आले आहे.
लॉकडाउनमुळे विविध व्यावसायिक संघटना, सहकारी संस्था, राजकीय नेते आदींना त्यांचे व्यवसाय, प्रश्न यासंदर्भात चर्चा करण्यासाठी एखादा हॉल भाडेपट्ट्याने घेऊन एकत्र येणे शक्य नाही. मात्र, आपापल्या घरात बसूनच वेबिनार, फेसबुक लाईव्ह, विविध ऍपच्या माध्यमातून हे सर्वजण त्यांचा हेतू साध्य करीत आहेत. तेही अगदी मोफत.
कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी गेल्या सव्वा महिन्यापासून लॉकडाउन सुरु आहे. व्यावसायिक संघटनांच्या आपापला व्यवसाय वाढविण्यासाठी
बदलत्या प्रवाहांचा मागोवा घेण्यासाठी बैठकांची आवश्यकता असते. त्याद्वारे विचारांचे आदानप्रदान होत असते. त्यातून नवीन ग्राहकही मिळत असतात.
सहकारी संस्थांच्याही विविध समस्या असतात. सरकारचे नवीन नियम, सहकार खात्याच्या कायद्याच्या अंमलबजावणीतील अडचणी यासारख्या विषयांवर या संस्थांच्या पदाधिकाऱ्यांना वेळोवेळी तज्ञांच्या मार्गदर्शनाची गरज असते. त्याचप्रमाणे राजकीय नेत्यांनाही विविध प्रश्नांवर त्यांची भूमिका मांडायची असते. त्याद्वारे त्यांना प्रसिद्धीही हवी असते. त्याचप्रमाणे प्रशासनालाही त्यांची भूमिका नागरिकांपर्यंत पोचवायची असते. त्यासाठीची पारंपरिक संवाद माध्यमे सध्या पूर्णपणे कार्यरत नाहीत. त्यामुळे या सर्वच घटकांनी त्यासाठी तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणात वापर करण्यास सुरवात केली आहे.
महापालिका, पिंपरी-चिंचवड हाउसिंग सोसायटी फेडरेशन यांनी वेबिनारचे आयोजन केले आहे. एका कामगार नेत्यानेही फेसबुक लाईव्हद्वारे सध्याच्या पार्श्वभूमीवर प्रशासन, कामगार यांच्याशी कामगारांच्या सद्यस्थितीविषयी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून त्याची भूमिका मांडली. चिखली-मोशी हाउसिंग सोसायटी फेडरेशनच्या वतीनेही अशाच प्रकारे वेबिनारचे आयोजन करण्यात आले. त्याचप्रमाणे गेल्या काही दिवसांपासून ब्राम्हण बिझनेस नेटवर्कच्या वतीने रोज विविध क्षेत्रातील तज्ञांना फेसबुकवर आमंत्रित करण्यात येते. त्याद्वारे नेटवर्कमध्ये सहभागी असलेल्या व्हॉटसऍपवर प्रश्न विचारण्यास सांगण्यात येते. या प्रश्नांची उत्तरेही संबंधित तज्ञाकडून व्हॉटसऍपवर लगेच देण्यात येत आहेत.
पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
वेबिनारमध्ये सामान्यपणे एक हजारपर्यंत लोक सहभागी होऊ शकतात. मात्र, सामान्यपणे तीनशेपर्यंत लोक सहभागी झाल्यास वेबिनार अधिक चांगला यशस्वी होतो, असा आयोजकांचा अनुभव आहे. तंत्रज्ञानाचा वापर अत्यंत कमी खर्चात परस्पर संवादासाठी यशस्वीपणे करता येतो, याची अनुभव यापैकी बहुतेकांना आला आहे. त्यामुळे त्यांचे अशा बैठकांसाठी घेण्यात येणाऱ्या हॉलच्या शुल्कापोटी द्यावे लागणाऱ्या हजारो रुपयांची बचत झाली आहे. त्यामुळे आगामी काळातही अशाच प्रकारे बैठका, चर्चा होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
कसा होतो संवाद...
वेबिनार घेताना संबंधित संस्था, संघटनांच्या व्हॉटसऍप ग्रुपवर वेबिनारची तारीख, वेळ, विषय, वक्त्यांची नावे कळविली जातात. तसेच सभासदांना ई-मेलही पाठविले जातात. त्यानंतर दिलेल्या वेळी प्रत्येकाने आपापल्या कॉम्प्युटर, लॅपटापसारख्या उपकरणांद्वारे ऑनलाइन हजर राहणे अपेक्षित असते. उपस्थित आणि वक्ते यांच्यात समन्वय साधण्याची जबाबदारी एखादी व्यक्ती समन्वयक म्हणून पूर्ण करते.
पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
"आगामी काळातही वेबिनार आयोजित करण्यात येणार आहे. भविष्यात सोसायट्यांच्या कन्व्हेअन्स डिड संदर्भात अशाच प्रकारे वेबिनार आयोजित करण्यात येतील."
- संजीवन सांगळे, अध्यक्ष - चिखली-मोशी हाऊसिंग सोसायटी फेडरेशन
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.