CoronaVirus : ते 34 जण बरे झाले; पण, असे...

CoronaVirus : ते 34 जण बरे झाले; पण, असे...
Updated on

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वायसीएम आणि भोसरी रुग्णालयात दाखल तब्बल 34 रुग्णांना आज रविवारी (ता. 10) घरी सोडण्यात आले. मात्र, त्यांचे चौदा दिवसांच्या उपचाराचा कालावधीत पूर्ण झालेला नाही. केंद्र सरकारच्या आरोग्य मंत्रालयाच्या नवीन सूचनेनुसार कोरोनाची कोणतीही लक्षणे नसलेल्या रुग्णांबाबत हा निर्णय घेण्यात आला आहे. या 34 जणांमध्ये पुण्यातील चार जणांचा समावेश आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

कोरोनाची लक्षणे आढळलेली व्यक्ती रुग्णालयात दाखल झाल्यानंतर त्याच्या घशातील द्रवांचे नमुने एनआयव्हीकडे तपासणीसाठी पाठविले जातात. त्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर 14 दिवस उपचार केले जात होते. त्यानंतर 24 तासांत दोन वेळा चाचणी घेतली जात होती. दोन्ही चाचण्यांचे रिपोर्ट निगेटिव्ह आलेल्या व्यक्तींना घरी सोडण्यात येत होते. मात्र, केंद्र सरकारच्या आरोग्य मंत्रालयाने शनिवारी (ता. 9) रात्री दिलेल्या नवीन सूचनांनुसार दहा दिवस उपचार केल्यानंतर कोरोनाची कोणतीही लक्षणे नसलेल्या व्यक्तीला घरी सोडण्यात येणार आहे. त्यानुसार पुण्यातील चार आणि पिंपरी-चिंचवडमधील 30 जणांना आज घरी सोडण्यात आले.

पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

महापालिका रुग्णालयात दाखल एकूण रुग्णांची संख्या रविवारी 169 झाली. यात रविवारी पॉझिटिव्ह आढळलेल्या दोन रुग्णांचाही समावेश आहे. आजपर्यंत 107 जणांना घरी सोडण्यात आले आहे. सध्या 58 जणांवर उपचार सुरू असून, आजपर्यंत चार जणांचा मृत्यू झाला आहे. मात्र, पुण्यातील 19 जणही शहरात दाखल होते. त्यातील चार जणांचा मृत्यू झालेला असून, सात जण बरे होऊन घरी गेले आहेत. सध्या आठ जणांवर उपचार सुरू आहेत. 

आयुक्त म्हणाले... 

केंद्र सरकारच्या नवीन सूचनेनुसार रुग्णांबाबत निर्णय घेण्यात आला. ज्यांच्यामध्ये कोरोनाची कोणतीही लक्षणे नाहीत, अशा व्यक्तींवर 10 दिवस उपचार झाल्यानंतर चाचणी न घेता घरी सोडण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यानुसार 34 जणांना आज घरी सोडण्यात आले, असे महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com