esakal | फेक अकाउंटवरून शरद पवार यांना धमकी

बोलून बातमी शोधा

Sharad Pawar

फेक अकाउंटवरून शरद पवार यांना धमकी

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पिंपरी - सोशल मीडियावर बनावट अकाउंट तयार करून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबाबत आक्षेपार्ह लिखाण करून बदनामी केली. तसेच, त्यांना जिवे मारण्याची धमकी दिली. हा प्रकार २७ मार्च ते सात एप्रिल या कालावधीत घडला. या प्रकरणी २६ जणांवर मुंबईतील नोडल सायबर पोलिस ठाणे येथे गुन्हा दाखल करून सांगवी पोलिस ठाण्यात वर्ग करण्यात आला आहे.

राष्ट्रवादीचे युवक प्रदेश कार्याध्यक्ष रविकांत संभाजी वरपे (वय ३४, रा. पिंपळे निलख, पुणे) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार फेसबुक पेजवर सीएम देवेंद्र फडणवीस फॅन क्लब, राजकारण महाराष्ट्राचे, भाजपा सोशल मीडिया वॉर रूम महाराष्ट्र, टकलु हैवान, देवेंद्र फडणवीस फॉर महाराष्ट्रा या नावाच्या बनावट फेसबुक पेजवर पोस्ट करणारे धनंजय जोशी, अतुल आर्चित, सोनाली राणे, मधुकर वाघमारे यांच्यासह फेसबुक अकाउंटधारक राजेंद्र पवार, गिरीश गणू, सिद्धार्थ जोशी, विश्वंभर देव, गोविंद कुलकर्णी, धनंजय जोशी, महेश गबुडले, विक्रांत एस. जोशी, नाना पंडित, राम शिंदे पाटील, शशिकांत आहिरे, राधा माने, भानू बोराडे, सचिन दाभाडे पाटील, श्रीकांत पाटील, नितीन मताले, दयानंद पाटील, अजय राठोड यांच्यावर गुन्हा दाखल आहे. तेढ निर्माण करणे, व्यक्तीच्या लौकिकाला बाधा आणणे, बदनामी करणे, अवमान करणे, अफवा पसरवणे अशा कलमांखाली गुन्हे दाखल आहेत.