'आम्ही इथले भाई', धमकी देत मारहाण; लॉजमध्ये तोडफोड करून लुटले

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 7 January 2021

आम्ही या भागातले भाई आहे. तु आम्हाला ओळखत नाहीस का? तक्रार केलीस तर जिवंत सोडणार नाही अशी धमकी देत तरुणाला बेदम मारहाण करण्यात आली. तरुणाच्या खिशात असलेले 5 हजार रुपये जबरदस्तीने काढून घेतले.

पिंपरी - लॉजमध्ये असलेल्या पुस्तकामध्ये एंट्री नोंदवण्यावरून झालेल्या वादात दोघांनी एका तरुणाला मारहाण केल्याची घटना वडमुखवाडी इथं घडली आहे. आम्ही या भागातले भाई आहे. तु आम्हाला ओळखत नाहीस का? तक्रार केलीस तर जिवंत सोडणार नाही अशी धमकी देत तरुणाला बेदम मारहाण करण्यात आली. या मारहाणीनंतर तरुणाच्या खिशात असलेले 5 हजार रुपये जबरदस्तीने काढून घेतले आणि लॉजमधील साहित्याची तोडफोडही केली. 

पिंपरी चिंचवडच्या बातम्यांसाठी येथे क्लिक करा 

याबाबत मिळालेली माहिती अशी की, साहिल शहा (वय 23, रा. गजानन महाराज नगर, दिघी), शुभम तरटे (वय 22, रा. काटे कॉलनी क्रमांक एक, आळंदी) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी त्यांना अटक केली आहे. रामेश्वर जीवन घोडके (वय 25, रा. गंधर्व लॉज, माउलीनगर, वडमुखवाडी) यांनी दिघी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. बुधवारी (ता. 6) सायंकाळी सव्वा सहाच्या सुमारास वडमुखवाडी येथील गंधर्व लॉजच्या काउंटरवर फिर्यादी असताना आरोपी तिथे आले. फिर्यादी घोडके यांनी आरोपींना लॉजच्या पुस्तकात नावाची एंट्री करण्याची विनंती केली. त्याचा राग आल्याने आरोपींनी 'तू आम्हाला ओळखत नाही का. तुला लय माज आलाय का. थांब तुला दाखवतो' असे म्हणून घोडके यांना शिवीगाळ करून लाथाबुक्‍क्‍यांनी बेदम मारहाण केली. 

पुण्यातील इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

आरोपींनी घोडके यांच्या खिशातून जबरदस्तीने पाच हजार रुपये काढून घेतले. लॉजच्या काउंटरवरील झेरॉक्‍स मशीन, पाण्याचा जार जमीनीवर आपटून दोन हजार रुपयांचे नुकसान केले. 'आम्ही या भागातील भाई आहे. कुठे तक्रार केली तर तुम्हाला जिवंत सोडणार नाही' अशी धमकी देऊन आरोपी निघून गेले. पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली आहे. दिघी पोलिस अधिक तपास करीत आहेत.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: threatens and beating man in lodge two arrested by police

Tags
टॉपिकस
Topic Tags: