
- अविनाश ढगे
पिंपरी - महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) तीनही मध्यवर्ती कार्यशाळा बंद करण्याचा घाट प्रशासनाने घातला आहे. त्यादिशेने पाऊले उचलण्यास सुरुवात झाली आहे. पहिल्या टप्यात मध्यवर्ती कार्यशाळेतील तृतीय आणि चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. कर्मचाऱ्यांना सोमवारी दुपारी १२ वाजेपर्यंत (ता. २६) पाच विभागांचे पसंतीक्रम देण्याचे आदेश महाव्यवस्थापक मोहनदास भरसट यांनी काढले आहेत.