esakal | पिंपरी-चिंचवड शहरात घरफोडीच्या तीन घटना; लाखांचा ऐवज लंपास 
sakal

बोलून बातमी शोधा

पिंपरी-चिंचवड शहरात घरफोडीच्या तीन घटना; लाखांचा ऐवज लंपास 

भोसरी, वाकड व चिखली येथे घडलेल्या घरफोडीच्या वेगवेगळ्या तीन घटनेत चोरट्यांनी सव्वा दोन लाखांचा ऐवज लंपास केला.

पिंपरी-चिंचवड शहरात घरफोडीच्या तीन घटना; लाखांचा ऐवज लंपास 

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पिंपरी : भोसरी, वाकड व चिखली येथे घडलेल्या घरफोडीच्या वेगवेगळ्या तीन घटनेत चोरट्यांनी सव्वा दोन लाखांचा ऐवज लंपास केला. भोसरी येथील घटनेप्रकरणी वामन भीमराव ठेंग (रा. सहकार कॉलनी, पांडवनगर, चक्रपाणी वसाहत, भोसरी) यांनी भोसरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. फिर्यादी यांच्या घराच्या दरवाजाचा कडीकोयंडा उचकटून चोरटा आत शिरला. चोरट्याने एक लाख पाच हजारांचे सोन्याचे; तर दीड हजारांचे चांदीचे दागिने, पंधरा हजारांचा टॅब व सात हजारांचा मोबाईल, असा एकूण एक लाख लाख 28 हजार 500 रुपयांचा ऐवज लंपास केला. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

दुसरी घटना चिखलीतील म्हेत्रे वस्ती येथे घडली. याप्रकरणी युगांत बाळासाहेब चव्हाण (रा. श्रीराम सोसायटी, म्हेत्रे वस्ती, चिखली) यांनी चिखली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. उघड्या खिडकीवाटे घरात शिरलेल्या चोरट्याने 25 हजारांचा लॅपटॉप व 8 हजारांचा मोबाईल, असा एकूण 33 हजारांचा ऐवज लंपास केला. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

तसेच, तिसऱ्या घटनेत वाकड येथे रंगकाम करण्यासाठी आलेल्या कामगारांनीच घरातील दागिन्यांवर डल्ला मारला. अरुण हरिभाऊ पारखे (वय 35, रा. पद्मावती), राम यादव (वय 45, रा. धनकवडी) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी अविनाश निर्मलचंद बारीक (रा. सिग्नीचर हाईट्‌स, वाकड) यांनी हिंजवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. आरोपी हे फिर्यादी यांच्या घरी रंगकाम करण्यासाठी आले होते. त्यावेळी त्यांनी फिर्यादी यांची नजर चुकवून कपाटातील 74 हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरले.