पुणे-लोणावळा लोकलच्या आणखी तीन फे-या पुर्नप्रस्थापित

कोविडचा प्रादुर्भाव हळूहळू कमी होत असताना वाढत्या प्रवाशांची लक्षात घेता मध्य रेल्वेकडून पुणे लोणावळा लोकलच्या तीन फे-या पुर्नप्रस्थापित करण्याचा निर्णय गुरुवारी (ता. १७) घेण्यात आला.
local
localsakal
Summary

कोविडचा प्रादुर्भाव हळूहळू कमी होत असताना वाढत्या प्रवाशांची लक्षात घेता मध्य रेल्वेकडून पुणे लोणावळा लोकलच्या तीन फे-या पुर्नप्रस्थापित करण्याचा निर्णय गुरुवारी (ता. १७) घेण्यात आला.

तळेगाव स्टेशन - कोविडचा (Covid) प्रादुर्भाव हळूहळू कमी होत असताना वाढत्या प्रवाशांची (Passenger) लक्षात घेता मध्य रेल्वेकडून पुणे लोणावळा लोकलच्या (Pune Lonavala Local) तीन फे-या पुर्नप्रस्थापित करण्याचा निर्णय गुरुवारी (ता. १७) घेण्यात आला आहे. त्यानुसार पुणे रेल्वे स्थानकावरून सकाळी ५:४५, ९:५५ आणि सायंकाळी ५:१५ वाजताच्या लोकल पुन्हा सुरु होणार आहेत.

याच लोकल गाड्या लोणावळ्याहून अनुक्रमे सकाळी ७:०५, ११:१५ आणि रात्री ०६ :३८ ला पुण्याकडे प्रस्थान करतील. याअगोदर पुणे-लोणावळा लोकसेवेच्या आठ फे-या यापुर्वीच प्रवाशांच्या सेवेत आहेत. आता आणखी तीन फे-या चालू होत असल्यामुळे चाकरमानी लोकल प्रवाशांमधे समाधानाचे वातावरण आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com