'एक्स्प्रेस वे'वर अपघाताचं सत्र कायम; तीन वाहनांच्या अपघातात एकाचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 11 October 2020

  • पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर (एक्स्प्रेस वे) अपघातांची मालिका सुरू

लोणावळा : पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर (एक्स्प्रेस वे) अपघातांची मालिका सुरूच असून, रविवारी (ता. 11) दुपारी खोपोली हद्दीत अवजड ट्रेलर, कंटेनर आणि कारचा भीषण अपघात झाला. त्यात ट्रेलर चालकाचा जागीच मृत्यू झाला, तर तीन जण जखमी झाले. अपघातामुळे द्रुतगती मार्गावरील मुंबईकडे जाणारी वाहतूक विस्कळीत झाली आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

खोपोली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, द्रुतगती मार्गावर फूडमॉल जवळील तीव्र उतारावर लोखंडी कॉईल घेऊन जाणाऱ्या ट्रेलरचा टायर फुटल्याने चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. त्यामुळे  ट्रेलर पुढे जाणाऱ्या कंटेनर व कारवर जोरात आढळला. यावेळी लोखंडी कॉईल रस्त्यावर उलटली. या अपघातात लोखंडी कॉईल घेऊन जाणाऱ्या ट्रेलर चालकाचा जागीच मृत्यू झाला. कारमधील तिघे प्रवासी जखमी झाले. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

दरम्यान, अपघाताची माहिती समजताच बोरघाट महामार्ग पोलिस, खोपोली पोलिस, सामाजिक संस्थेचे सदस्य घटनास्थळी दाखल होत मदतकार्य सुरू केले. अपघातामुळे मुंबईकडे जाणारी वाहतूक विस्कळीत झाली असून, संथ गतीने सुरू आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: three vehicles collided near khopoli on pune mumbai expressway, one death