नववर्षाचे सेलिब्रेशन निराधार मुलांबरोबर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नववर्षाचे सेलिब्रेशन निराधार मुलांबरोबर
नववर्षाचे सेलिब्रेशन निराधार मुलांबरोबर

नववर्षाचे सेलिब्रेशन निराधार मुलांबरोबर

sakal_logo
By

वाकड, ता. ५ : पिंपळे सौदागर येथील प्रशिक्षणार्थी डॉक्टरांच्या स्वराज्य ग्रुपने, दिघी येथील मातृछाया बालकाश्रमातील अनाथ मुलांबरोबर नववर्षाचे सेलिब्रेशन करीत वर्षाची सुरवात केली. निराधार मुलांबरोबर गप्पा मारल्या, खाऊवाटप व अन्नदान करून आश्रमासाठी किराणा वस्तू भेट दिल्या.
नवीन वर्ष कसे साजरे करायचे यावर चर्चा करताना, शुभांकर वाघेरे यांनी एक दिवस मातृछायामधील मुलांसाठी ही संकल्पना मांडली व ती ग्रुपमधील सर्व सभासदांना आवडली. कोरोनाचे सर्व नियम पाळून, सभासदांनी मातृछाया गाठले. दिवसभर या बालकांसोबत धमाल मस्ती करून संध्याकाळी मुलांचा निरोप घेतला. शुभांकर वाघेरे यांनी संयोजन केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी हार्दिक गुडवार, राजेंद्र कुंभार, अफ्रोज पटेल, सोहम धायगुडे व सर्व सभासदांनी परिश्रम घेतले.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top