दफनभूमी प्रश्नाबाबत तोडगा नाही | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दफनभूमी प्रश्नाबाबत तोडगा नाही
दफनभूमी प्रश्नाबाबत तोडगा नाही

दफनभूमी प्रश्नाबाबत तोडगा नाही

sakal_logo
By

वाकड, ता. १२ : अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या थेरगाव-काळेवाडी दफनभूमीप्रश्नी कब्रस्तान संघर्ष समितीने खासदार श्रीरंग बारणे, भाजपचे शहराध्यक्ष तसेच आमदार महेश लांडगे, लक्ष्मण जगताप, राष्ट्रवादीचे आमदार अण्णा बनसोडे या सर्वांची भेट घेऊन मुस्लिम समाजाच्या दफनभूमी प्रश्नाबाबत चर्चा केली व मुस्लिम समाजाला काळेवाडी-थेरगाव परिसरामध्ये दफनभूमीसाठी जागा उपलब्ध करून देण्याबाबत निवेदन देण्यात आले.
मागील दोन दिवसांपासून शहरातील सर्वच राजकीय पक्षांच्या लोकप्रतिनिधींच्या भेटीगाठी घेण्यात येत आहेत. समाज बांधवांच्या भावनांचा उद्रेक पाहता पोलिस प्रशासनासही समाजाच्या भावना निवेदनाद्वारे पोचविण्यात आल्या आहेत. सर्वपक्षीय आमदारांनी महापालिका आयुक्त राजेश पाटील यांच्याशी बैठक घेऊन याबाबत तोडगा काढण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. खासदार बारणे यांनीही या प्रकरणात लक्ष घालण्याचे आश्वासन दिले आहे.
दफनविधीसाठी जागाच उपलब्ध नसल्याने प्रशासनाकडून समाजावर अन्याय होत असून, मुस्लिम बांधवांच्या मानवी हक्कांचे उल्लंघन होत असल्याचा आरोप होत आहे. मागील महिनाभरात कब्रस्तान संघर्ष समितीने परिसरात अनेक बैठका घेत मोठे जनआंदोलन उभे करण्याचा निर्धार केला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, अल्पसंख्यांकमंत्री नवाब मलिक यांना पत्रे पाठविले. महापालिका आयुक्त राजेश पाटील, नगररचना विभागाचे उपसंचालक प्रभाकर नाळे यांचीही भेट घेऊन जागा उपलब्ध करून देण्यासाठी निवेदन देण्यात आले होते. मात्र तोडगा अद्याप निघू शकला नाही.
समन्वयक सिद्दीक शेख, आवद चाऊस, तौफिक पठाण, कारी इक्बाल उस्मानी, नूर खान, शब्बीर शेख, मिटू शेख, इम्रान शेख, लतीफ अन्सारी, जुम्मादिन मुलाणी, मुस्तफा तांबोळी, शकील बेग, मैनुद्दीन शेख, तहसीन खान, अख्तर खान, अयुब इनामदार, अल्ताफ शेख, मलंग शेख, इम्रान शेख, फय्याज सय्यद, अब्दुल गणी सय्यद, कलीम शेख यांच्यासह अनेकजण उपस्थित होते.


पिंपरी ः आमदार लक्ष्मण जगताप व अण्णा बनसोडे यांना निवेदन देताना कब्रस्तान संघर्ष समितीचे सदस्य.
पिंपरी ः खासदार श्रीरंग बारणे यांना निवेदन देताना कब्रस्तान संघर्ष समितीचे सदस्य.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top