नृसिंहवाडीत दत्त मंदीर घाटावर आज स्वच्छता

नृसिंहवाडीत दत्त मंदीर घाटावर आज स्वच्छता

नृसिंहवाडीत दत्त मंदिर घाटावर आज स्वच्छता
नृसिंहवाडी, ता. २१ ः ‘चला पंचगंगा वाचवूया'' या ‘सकाळ’च्या उपक्रमाला बळ देण्यासाठी येथील दत्त मंदिर घाटावर उद्या दुपारी दोन वाजता स्वच्छता मोहीम होणार आहे. दरम्यान, यावेळी राजर्षी शाहू कृतज्ञता जलदिंडीच्या रॅलीचे उद्‍घाटन शिरोळचे गटविकास अधिकारी शंकर कवितके, सरपंच पार्वती कुंभार, उपसरपंच रमेश मोरे यांच्या हस्ते होणार आहे. ही रॅली शिरोळ, धरणगुत्ती, नांदणी, यड्राव मार्गे इचलकरंजीला जाणार आहे. यावेळी गावागावांत पंचगंगा शुद्धतेचा जागर केला जाणार आहे. इचलकरंजीत समारोपाच्या कार्यक्रमात ही रॅली सहभागी होईल.
मोहिमेत दत्त देवस्थानचे अध्यक्ष सदाशिव जेरे पुजारी, सचिव संजय पुजारी, पंचगंगा प्रदूषण कृती समितीचे विश्वास बालीघाटे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे बंडू पाटील, माजी सरपंच धनाजीराव जगदाळे, उपसरपंच अभिजित जगदाळे, व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष अनंतराव धनवडे, माजी सरपंच धनाजीराव जगदाळे, डॉ. किरण आणुजे, डॉ. दिनेश फडणीस, भाजपचे नेते संजय शिरटीकर, ब्राह्मण सभेचे अध्यक्ष गिरीष खोंबारे, दीपक मिटके, किरण मुडशिंगे, कृष्णा गवंडी, संजय गवंडी, हेमंत बाहुलेकर, ग्रामपंचायत सदस्य, सामाजिक कार्यकर्ते आदी उपस्थित राहणार आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com