वाकडमध्ये आयटीयन्सना वारंवार विजेचा ‘शॉक’ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वाकडमध्ये आयटीयन्सना वारंवार विजेचा ‘शॉक’
वाकडमध्ये आयटीयन्सना वारंवार विजेचा ‘शॉक’

वाकडमध्ये आयटीयन्सना वारंवार विजेचा ‘शॉक’

sakal_logo
By

वाकड, ता. १५ : हिंजवडीत काम करणारे असंख्य आयटीयन्स वाकड आणि पिंपळे सौदागर परिसरात वास्तव्यास आहेत.
महापालिका प्रशासन आणि महावितरण यांच्यातील समन्वयाअभावी रस्त्यांची कामे व खोदकाम करीत आहे. परिणामी वीज केबल तुटून वीज खंडित होण्याचे प्रमाण वाढले आहे. त्याचा त्रास नागरिकांना होत असून, वर्क फ्रॉम होमला अनेकदा ‘ब्रेक’ बसत आहे.
स्मार्ट सिटी अंतर्गत विकासकामे, रस्ते व पदपथ बसविण्यात येत आहेत. या कामांसाठी ठेकेदार नियुक्त केले आहेत. ते काम करताना भूमिगत केबलची माहिती न घेता थेट खोदाई करतात. त्यामुळे भूमिगत वीज वाहिन्या तुटून हा खोळंबा होत आहे. खोदकाम करण्यापूर्वी महावितरण विभागाला कल्पना दिल्यास किंवा त्यांचा कर्मचारी सोबत घेऊन खोदकाम केल्यास अशा घटनांना आळा बसण्यास मदत होऊ शकते. वाकडमधील आयटी अभियंत्यांचे वर्क फ्रॉम होम सुरू आहे. मात्र, तासनतास वीज खंडित झाल्याने सर्वच नागरिकांना मोठा मनस्ताप होत आहे. त्याचबरोबर जनरेटरचा महिन्याकाठी हजारोंचा भुर्दंड बसत आहे.
‘‘वाकड परिसरातील भूमिगत वीज केबल जुनी झाल्याने वारंवार ही समस्या उद्भवत आहे. रहिवाशांना गेल्या अनेक वर्षांपासून वीजपुरवठा खंडित होण्याच्या समस्येचा सामना करावा लागत आहे. महापालिका आणि महावितरणने समन्वय साधून एकदाच सर्वत्र नवीन केबल टाकून आम्हाला ता समस्येतून कायमचे मुक्त करावे.
- दत्तात्रेय देशमुख, चेअरमन, मॅक्सिमा सोसायटी

‘‘मी हा मुद्दा अनेकदा मांडला आहे. महापालिका तसेच महावितरण यांच्यात समन्वय नसल्याने काम अपूर्ण राहून नागरिकांचे हाल होतात. गेल्या महिन्यात अनेकदा ही समस्या उद्भवली. त्यामुळे माझ्या मुलीची परीक्षा बुडाली. योग्य केबल लाइन नसल्याने त्यांनी केबलला तात्पुरते पॅच केले. बिल्डरने दिलेला डक्ट सुद्धा तुटला आणि केबल्स तात्पुरत्या प्लॅस्टिकच्या डक्टमध्ये टाकल्या. आता हा प्लास्टिकचा डक्ट किती काळ टिकणार आहे.’’
- तेजस्विनी ढोमसे, अध्यक्षा पिंपरी चिंचवड हाउसिंग फेडरेशन

‘‘नवीन केबल लाईन टाकण्याचे काम आम्ही करू. रस्त्याचे काम सुरू असताना केबल लाईन असो, ड्रेनेज लाईन असो किंवा पाण्याची लाईन असो, सर्व काही भूमिगत केले जाईल. ज्या केबल लाईन विनापरवाना पडून आहेत त्याबाबत संबंधित विभागाला निर्देश देण्यात येतील. महापालिकेतील भाजपच्या सत्तेमुळे देखील आम्हाला काम करण्यास अडचणी येतात.’’
- मयूर कलाटे नगरसेवक


महापालिकेच्या स्थापत्य विभागाकडून काही कामे चालू आहेत मात्र कामे करताना त्यांनी खबरदारी घेऊन खोदकामे करणे गरजेचे आहे. आमच्याकडे नवीन केबल टाकण्याची काहीही तरतूद नाही केवळ आवश्यकतेनुसार केबल शिफ्टिंग केल्या जातील आणि खुपच गरज असल्यास तेवढी केबल बदलली जाईल.
महेश कावळे उपअभियंता
विद्युत विभाग, ड क्षेत्रीय कार्यालय

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top