
शिक्षण विभागाचे ठराव रद्द करावे
पिंपरी, ता. १५ ः महापालिकेच्या प्राथमिक शिक्षण विभाग यांच्यावतीने विभागांतर्गत तरतूद वर्गीकरण करण्यासाठी केलेले सर्व ठराव व आदेश रद्द करण्यात यावे, अशी मागणी साद प्रतिष्ठानचे अध्यक्ष राहुल कोल्हटकर यांनी केली आहे. याबाबत आयुक्त राजेश पाटील यांना निवेदन दिले आहे.
दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,‘‘प्राथमिक शिक्षण विभागाच्या सन २०२१-२०२२ अंदाजपत्रकामध्ये ‘‘टॅब खरेदी व प्रशिक्षण’’ लेखा शीर्षकावर साडेबारा कोटी इतकी तरतूद उपलब्ध केली आहे. सद्यपरिस्थितीत या लेखा शीर्षकावर अजून तरतुदीची आवश्यकता असल्याने या विभागांतर्गत रक्कम वर्गीकरणाकरिता मान्यता देण्याबाबत विचार करण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. दरम्यान आता प्राथमिक शाळांचे वर्ग सुरू करण्यात येणार आहेत. त्यामुळे मुलांना टॅब ची जास्त आवश्यकता नाही. ४० हजाराच्या पेक्षा जास्त टॅब खरेदी करिता तब्बल ४४ कोटी निधीची गरज आहे. पण पर्याप्त प्रमाणात निधी उपलब्ध नसल्याने शिक्षण विभागाच्या इतर कामाचा निधी वर्ग करण्यात येत आहे.’’
Web Title: Todays Latest Marathi News
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..