
थेरगाव येथे जिल्हास्तरीय थाय बॉक्सिंग स्पर्धा उत्साहात
चिंचवड, ता. १७ : थेरगाव येथे माऊली सोशल फाउंडेशन व राष्ट्रवादी काँग्रेस चिंचवड विधानसभा यांच्यावतीने झालेल्या जिल्हास्तरीय थाय बॉक्सिंग स्पर्धा उत्साहात पार पडल्या.
थेरगाव येथील मोरया मंगल कार्यालयात सचिन निंबाळकर व ज्योती निंबाळकर यांच्यावतीने आयोजित या स्पर्धेचे उद्घाटन चिंचवड विधानसभेच्या अध्यक्षा संगीता कोकणे, व सुवर्णा वाळके यांच्या हस्ते झाले. शहराध्यक्ष संजोग वाघेरे, महिला अध्यक्षा वैशाली काळभोर यांनी मार्गदर्शन केले. निवड झालेले संघ अल्टिमेट मार्शल आर्ट (प्रथम क्रमांक), शार्प स्पोर्ट्स फाउंडेशन (द्वितीय), युनिव्हर्सल फाइट ॲण्ड फिटनेस (तृतीय) आणि चतुर्थ क्रमांक युनिव्हर्सल स्पोर्ट्स असे आहेत. विजेते संघ २५ तारखेला राज्यपातळीवर लातूरला खेळणार आहेत. महिला निरीक्षक उज्वला शेवाळे, माजी महापौर नगरसेविका अपर्णा डोके व पुष्पा शेळके उपस्थित होते.
Web Title: Todays Latest Marathi News
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..