पाण्याची टाकी फुटल्याने कोथुर्ण्यात महिलेचा मृत्यू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पाण्याची टाकी फुटल्याने
कोथुर्ण्यात महिलेचा मृत्यू
पाण्याची टाकी फुटल्याने कोथुर्ण्यात महिलेचा मृत्यू

पाण्याची टाकी फुटल्याने कोथुर्ण्यात महिलेचा मृत्यू

sakal_logo
By

पवनानगर, ता. ३१ : सिमेंटची पाण्याची टाकी फुटल्याने एका महिलेचा मृत्यू झाला असून, एक तरुणी गंभीर जखमी झाली आहे. मावळ तालुक्यातील कोथुर्णे (चिंचवाडी) येथे रविवारी (ता. ३०) ही घटना घडली. 
वैशाली लहू दळवी (वय २८) असे मृत्युमुखी पडलेल्या महिलेचे नाव आहे. त्यांची पुतणी श्रध्दा भाऊ दळवी (वय १५) ही गंभीर जखमी झाली आहे. तिच्यावर सोमाटणे येथील पवना हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.
वैशाली दळवी या श्रद्धा व आणखी एका मुलीला सोबत घेऊन, आपल्या राहत्या घरी कोथुर्णे (चिंचवाडी) येथे घराशेजारील पाण्याच्या टाकीजवळ कपडे धुण्यासाठी गेल्या होत्या. या टाकीची भिंत फुटून अंगावर कोसळल्याने वैशाली यांचा मृत्यू झाला तर त्यांची पुतणी गंभीर जखमी झाली आहे. या घटनेत आणखी एक मुलगी किरकोळ जखमी झाली आहे. या घटनेचा अधिक तपास कामशेत पोलिस करत आहेत.

फोटो- कोथुर्णे (चिंचवाडी) ः पाण्याची टाकी फुटल्यामुळे एका महिलेचा मृत्यू झाला.
फोटो ः 1214

Web Title: Todays Latest Marathi News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top