प्राणी मित्रांमुळे मिळाले श्वानाला जीवदान... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

प्राणी मित्रांमुळे मिळाले श्वानाला जीवदान...
मावळच्या पर्यटनकेंद्रासाठी प्रयत्न करणार माऊली दाभाडे यांच्या सत्कारसोहळ्‍यात दत्तात्रेय भरणे यांची ग्वाही

प्राणी मित्रांमुळे मिळाले श्वानाला जीवदान...

sakal_logo
By

वाकड, ता. २० : तीन दिवसांपासून कुत्र्याच्या डोक्यामध्ये प्लॅस्टिकची बरणी अडकली... स्वतःवर ताबा नसलेला तो मग कुठेही बेफाम भटकू लागला... मानवनिर्मित जाळ्यात अडकलो असून जिवाला धोका असल्याची खात्री झाल्याने स्वतःला वाचविण्यासाठी तो सैरभैर पळू लागला अन् पळता पळता तो खोल विहिरीत पडला, मात्र वाइल्ड ॲनिमल्स ॲँड स्नेक प्रोटेक्शन सोसायटी सदस्यांच्या तत्परतेमुळे अखेर त्याला जीवदान मिळाले. त्यामुळे ‘देव तारी त्याला कोण मारी’ हा प्रत्यय स्थानिकांना आला.

हिंजवडीतील आदर्शनगर काकडे कॉलनीत हा प्रकार घडला. गेल्या तीन दिवसांपासून श्वानाच्या डोक्यामध्ये प्लॅस्टिकची बरणी अडकली होती. त्याला वाचवण्यासाठी वाइल्ड ॲनिमल्स अँड स्नेक प्रोटेक्शन सोसायटीच्या सदस्यांनी खूप प्रयत्न केले, परंतु काही केल्या कुत्रा सापडत नव्हता. तीन दिवस अन्न पाणी मिळाले नाही, त्यामुळे कुत्रा पाण्याच्या शोधात विहिरीच्या कडेला आला. विहिरीला संरक्षक भिंत नसल्याने तो सुमारे ४० ते ५० फूट खोल विहिरीत पाण्यामध्ये पडला.
शेतातील कामगारांनी या घटनेची माहिती संस्थेच्या सदस्यांना दिल्याने, लगेच त्या ठिकाणी वाइल्ड ॲनिमल्सचे सदस्य गणेश भुतकर, श्रीकांत काकडे, किरण जांभूळकर, शेखर जांभूळकर, तसेच तुषार पवार दाखल झाले. संरक्षक पट्ट्याच्या मदतीने विहिरीत उतरून हे रेस्क्यू ऑपरेशन राबविण्यात आले. मोठ्या प्रयत्नांनी श्वानाला सुखरूप बाहेर काढण्यात आले. त्याच्या डोक्यातील बरणी कापून त्याला मुक्त करण्यात आले.
--------------------
झाकण लावून बरण्यांची लावा विल्हेवाट
भटक्या कुत्र्यांना बरणीत ठेवलेल्या खाद्यपदार्थांचा वास आल्यामुळे श्वान त्यात डोके घालतात, पण ते डोके बाहेर काढायला असमर्थ ठरतात. परिणामी अन्नपाणी न मिळाल्याने त्यांचा काही दिवसांनी मृत्यू होतो. तरी नागरिकांनी मोकळ्या बरण्या कोठेही न टाकता, त्या झाकण लावून कचरा कुंडीत अथवा घंटागाडीतच टाकाव्यात, असे आवाहन संस्थेच्या सदस्यांनी केले आहे.
--------------------

Web Title: Todays Latest Marathi News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top