
सांगुर्डी कान्हेवाडी सहकारी सोसायटी निवडणूक-- बिनविरोध परंपरा खंडीत
कान्हेवाडी सोसायटीची २० रोजी निवडणूक
इंदोरी, ता. १३ ः सांगुर्डी कान्हेवाडी विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीची पंचवार्षिक निवडणूक २० फेब्रुवारी रोजी होत आहे. एक जागा बिनविरोध झाली असून उर्वरित ११ जागांसाठी २२ उमेदवार रिंगणात आहेत. सर्व जागांसाठी दुरंगी लढत होत आहे.
सोसायटीच्या आजपर्यंतच्या ९६ वर्षांच्या कालखंडातील निवडणुका बिनविरोध झालेल्या आहेत. ज्येष्ठांनी बिनविरोध निवडणुकीसाठी प्रयत्न करूनही यावेळी यश आले नाही.
कर्जदार गटासाठीच्या ८ जागांसाठी १६ उमेदवार तर महिला प्रवर्गासाठीच्या २ जागांसाठी ४ उमेदवार व अनुसूचित जात प्रवर्गासाठीच्या १ जागेसाठी २ उमेदवार आपले नशीब अजमावत आहेत. इतर मागास प्रवर्गातील शंकर रं. दिवसे बिनविरोध निवडून आले आहेत.
कर्जदार गटातील उमेदवार (८ जागा) ः सुदाम भा.भसे, महेश ना.भसे, बाबूराव शं.भोसले, संभाजी दा.भसे, अंकुश भा.भसे, दत्तात्रय द.भसे, अनिल अ.भसे, सहादू शं.काळे, किसन शं. भसे, रामदास जि.भसे, दत्तात्रय ए.लिंभोरे, तानाजी ब.काळे, श्रीधर चि.भसे, निलेश शं.येवले, कैलास वि.भसे, उमेश येवले.
महिला गट (२ जागा) ः सुनीता नं.भसे, जनाबाई स्वा.दिवसे, मंदाकिनी हि.पवार, मीनाबाई न.पवार.
अनुसूचित जाती प्रवर्ग (१ जागा) ः विजय ना.चव्हाण, प्रकाश मा.चव्हाण.
------
Web Title: Todays Latest Marathi News
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..