रामनवमी निमित्त सडवली येथील यात्रा उत्साहात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रामनवमी निमित्त सडवली येथील यात्रा उत्साहात
भंडारा डोंगर पायथ्याशी स्वच्छता मोहिमेस प्रारंभ सकाळ बातमीचा परिणाम

रामनवमी निमित्त सडवली येथील यात्रा उत्साहात

sakal_logo
By

बेबडओहळ, ता. १२ :  रामनवमी निमित्ताने श्री पद्मावती व जानुबाई देवी यात्रा नुकतीच  सडवली येथे उत्साहात पडली. यात्रेत पंचक्रोशीतील ८० बैलगाडा मालकांनी सहभाग घेतला होता. दोन वर्षांनी यात्रा झाल्यामुळे मोठ्या प्रमाणावर ग्रामस्थांनी गर्दी केली होती.
सडवली येथील अखंड हरिनाम सप्ताहात विलास महाराज दळवी, राम महाराज शास्त्री, सुकलाल महाराज बुचडे पांडुरंग महाराज लांडे, मधुकर महाराज गराडे, आसाराम महाराज बडे, आदींचे किर्तन झाली. सांगता श्यामराव महाराज फाळके यांच्या किर्तनाने झाली.
श्रीराम जन्मोत्सवानिमित्त भव्य छकडी चे आयोजन केले होते. यामध्ये घाटाचा राजा हा किताब नेरे येथील  सचिन जाधव यांना मिळाला. तर प्रथम क्रमांक शेंडगे आणि गराडे जुगलबंदी यांनी पटकाविला. तर द्वितीय क्रमांक चंद्रकांत तुळवे आणि सोमाभाऊ भेगडे यांनी पटकविला. घाटाचा राजासाठी चांदीची गदा प्रथम व  द्वितीय फायनलसाठी  रोख पाच हजार रुपयाचे बक्षीस देण्यात आले.
यात्रेनिमित्त  सोमनाथ कलापथक भजनी भारुड मंडळ सडवली मावळ यांचा भारुडाचा कार्यक्रम झाला.
याप्रसंगी राष्ट्रीय खेळाडू संपदा फाळके, पैलवान केतन घारे, प्रतीक देशमुख आदींचा सत्कार  करण्यात आला.   सरपंच अजित चौधरी, उपसरपंच नवनाथ  साळुंखे, नथू घारे, दत्तात्रेय ओझरकर, शंकर देशमुख, हनुमंत घारे सुनील दाभाडे, बाळासाहेब बदर आदी उपस्थित होते. यात्रेचे नियोजन व आयोजन ग्रामस्थांनी केले.
सडवली : येथील यात्रेत बैलगाडा शर्यतीत धावताना छकडी.

Web Title: Todays Latest Marathi News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top