लोणावळा, खंडाळ्यात सलग सुट्यांमुळे पर्यटकांची गर्दी; व्यावसायिकांमध्ये उत्साह | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Traffic in lonavala

महावीर जयंती, आंबेडकर जयंती, गुडफ्रायडे व विकेंडला जोडून आलेल्या सलग सुट्या यामुळे लोणावळा-खंडाळा परिसरात पर्यटकांची वर्दळ वाढू लागली आहे.

लोणावळा, खंडाळ्यात सलग सुट्यांमुळे पर्यटकांची गर्दी; व्यावसायिकांमध्ये उत्साह

लोणावळा - महावीर जयंती, आंबेडकर जयंती, गुडफ्रायडे व विकेंडला जोडून आलेल्या सलग सुट्या (Holiday) यामुळे लोणावळा-खंडाळा (Lonavala-Khandala) परिसरात पर्यटकांची (Tourist) वर्दळ वाढू लागली आहे. लोणावळा व खंडाळा ही ठिकाणे पर्यटकांच्या आकर्षणाची केंद्रे असल्याने पर्यटक लोणावळा परिसरातील भुशी डॅम, राजमाची, लोहगड, एकवीरा-भाजे लेणी परिसर, पवना धरण परिसरात सर्व मोसमामध्ये गर्दी करत असतात.

पर्यटकांचे सर्वाधिक पसंती असलेल्या लायन्स पॉइंट, खंडाळ्यातील राजमाची उद्यान, सनसेट पॉइंट येथेही पर्यटकांची पसंती मिळते. वाढलेला उकाडा तसेच माध्यमिक विभागाच्या परीक्षा यामुळे पर्यटकांची संख्या रोडावण्याची चिन्हे होती. शनिवार, रविवारला जोडून गुडफ्रायडे आल्याने सलग सुट्या आल्या आहे. याचबरोबर दहावी व बारावीच्या परीक्षा नुकत्याच संपल्या आहेत. त्यामुळे लोणावळा परिसरात पर्यटकांची वर्दळ सुरू झाली आहे.

लोणावळा परिसराबरोबर पवना धरण परिसरात जलक्रीडेसाठी पर्यटकांची पसंती मिळत आहे. लोणावळा परिसरातील वॉटरपार्क व खासगी बोटींग क्लबला पर्यटकांची पसंती मिळत असल्याचे चित्र आहे. या पार्श्वभूमीवर पर्यटकांची वर्दळ सुरू झाल्याने व्यावसायिकांमध्ये चैतन्य पसरले आहे. पर्यटनाचा हंगाम अद्याप सुरू झालेला नाही. कडक उन्हाळा वगळता पर्यटनाचा हंगाम चांगला जाण्याची आशा हॉटेल व्यावसायिक समीर इंगळे यांनी व्यक्त केली.

वाहनांच्या रांगा

विकेंडला जोडून आलेल्या सलग सुट्यांमुळे शुक्रवारी मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर मोठ्या संख्येने वाहने आल्याने बोरघाटात शुक्रवारपासूनच वाहतूक संथगतीने सुरु आहे. शनिवारीही परिस्थिती कायम होती. पर्यटनस्थळांवर पर्यटकांची वर्दळ वाढू लागल्याने लोणावळा शहरात महामार्गावर वाहनांच्या लांब रांगा लागल्याचे चित्र आहे. अपोलो गॅरेज ते किरण पेट्रोल मुनीर हॉटेल दरम्यान वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.

Web Title: Todays Latest Marathi News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top