जिल्हा बॅंक निवडणुकीसाठी मावळात ८६ टक्के मतदान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जिल्हा बॅंक निवडणुकीसाठी 
मावळात ८६ टक्के मतदान
जिल्हा बॅंक निवडणुकीसाठी मावळात ८६ टक्के मतदान

जिल्हा बॅंक निवडणुकीसाठी मावळात ८६ टक्के मतदान

sakal_logo
By

वडगाव मावळ, ता. २ ः पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेसाठी मावळ तालुक्यात १३३ पैकी ११५ (८६.४६ टक्के ) मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. मतदानाची प्रक्रिया शांततेत पार पडल्याची माहिती सहायक निबंधक विठ्ठल सूर्यवंशी यांनी दिली.
तालुक्यातील अ वर्ग मतदार संघातून ज्येष्ठ नेते माऊली दाभाडे यांची यापूर्वीच बिनविरोध निवड झाली आहे. महिला, पणन, पतसंस्था आदी पाच मतदार संघासाठी रविवारी मतदान झाले. येथील महिला सांस्कृतिक भवनात मतदानाची व्यवस्था करण्यात आली होती. महिला प्रतिनिधी मतदार संघासाठी ५५ पैकी ५०, ब वर्गासाठी एक पैकी एक, क वर्गासाठी २७ पैकी २७, ड वर्गासाठी ३७ पैकी ३७ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. वैयक्तिक मतदार संघासाठी मात्र तेरापैकी एकाही मतदाराने मतदान केले नाही. मतदानाची प्रक्रिया शांततेत पार पडली. राष्ट्रवादी काँग्रेस व भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी येथे भेट देऊन मतदान प्रक्रियेची माहिती घेतली.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top