कागल : जवाहर नवोदय विद्यालयात निवड चाचणी परीक्षा

कागल : जवाहर नवोदय विद्यालयात निवड चाचणी परीक्षा

जवाहर विद्यालयात निवडीसाठी ३० ला परीक्षा
सहावीच्या वर्गात प्रवेश; जिल्ह्यात ३४ केंद्रे; ९ हजारांवर परीक्षार्थी
कागल, ता. २१ : येथील जवाहर नवोदय विद्यालयात २०२२-२३ या शैक्षणिक वर्षात सहावीच्या वर्गात प्रवेश घेण्याची निवड चाचणी परीक्षा शनिवार (ता. ३०) घेण्यात येणार आहे. जिल्ह्यातील ३४ प्रमुख परीक्षा केंद्रांवर सकाळी साडेअकरा ते दीड या वेळेत परीक्षा होणार आहे. परीक्षेसाठी एकूण ९ हजार ६०० विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. परीक्षेसाठी अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांनी व मुख्याध्यापकांनी यांची नोंद घ्यावी. तसेच सदर परीक्षेची प्रवेशपत्रे ही नवोदय विद्यालयाच्या संकेतस्थळावरुन प्राप्त करून घेण्याची आहेत.
केंद्र व विद्यार्थी संख्या अशी ः स. म. लोहिया हायस्कूल (कोल्हापूर) - ३९६, पद्माराजे गर्ल्स हायस्कूल (कोल्हापूर) - ३९६, न्यू हायस्कूल (महाद्वार रोड, कोल्हापूर) -३००, महाराष्ट्र हायस्कूल (कोल्हापूर) - ३१२, कोल्हापूर हायस्कूल (कोल्हापूर) - १७८, कळे विद्यामंदिर (कळे) - ३२४, नेहरु विद्यामंदिर (कोतोली) - २२८, कोडोली हायस्कूल (कोडोली) - २९६, गर्ल्स हायस्कूल ॲण्ड ज्युनि.कॉलेज ऑफ कॉमर्स (इचलकरंजी) - ३१२, प्राथमिक आश्रमशाळा (हातकणंगले) - ३००, बळवंतराव यादव हायस्कूल (पेठवडगाव) - २४३, पद्माराजे विद्यालय (शिरोळ) - ३३६, बळवंतराव झेले हायस्कूल (जयसिंगपूर) - २२२, शाहू हायस्कूल (कागल) - २८८, यशवंतराव घाटगे हायस्कूल (कागल) - २६४, शिवराज विद्यालय (मुरगूड) - ३४८, मुरगूड विद्यालय (मुरगूड) - ३३६, श्री महालक्ष्मी हायस्कूल व ज्युनियर कॉलेज (सावर्डे बुद्रुक) - १९५ , गडहिंग्लज हायस्कूल (गडहिंग्लज) - ३३६, जागृती हायस्कूल (गडहिंग्लज) - ३३६, न्यू इंग्लिश स्कूल (चंदगड) - २७६, महात्मा फुले विद्यालय (मजरे कार्वे) -२३९, आजरा हायस्कूल (आजरा) - २९९, शाहू कुमार भवन (गारगोटी) - ३६०, कुमार भवन (कडगांव) - २०४, श्री मौनी महाराज हायस्कूल (गारगोटी) - १९४, राजर्षी शाहू विद्यामंदिर (राधानगरी) - २०४, किसनराव मोरे हायस्कूल (सरवडे) - ३६०, शिरगाव हायस्कूल (शिरगाव) - २५२, शिवाजीराव खोराटे विद्यालय( सरवडे) -३१२, श्री नागेश्वर हायस्कूल (राशिवडे) - २०२, परशूराम विद्यामंदिर (गगनबावडा) - १६८, शाहू हायस्कूल (शाहूवाडी ) - ३१२, महात्मा गांधी विद्यालय (बांबवडे) - २७२.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com