रवींद्र काकडे यांचा राजीनामा
Sakal

रवींद्र काकडे यांचा राजीनामा

ओमिक्रॉनच्या पार्श्वभूमीवर परदेशातून शहरात आलेल्या व त्यांच्या संपर्कातील व्यक्तींचे सर्वेक्षण महापालिकेने २४ नोव्हेंबरपासून सुरू केले आहे.

वडगाव मावळ, ता. १९ : वडगाव नगरपंचायतीमधील भाजपचे स्वीकृत नगरसेवक रवींद्र काकडे यांनी पक्षांतर्गत ठरल्याप्रमाणे आपल्या पदाचा राजीनामा दिला असून, या रिक्त पदाची निवड गुरुवारी (ता. २४ ) होणार आहे. स्वीकृत नगरसेवक पदासाठी भाजपने यापूर्वी ॲड. विजय जाधव, श्यामराव ढोरे, प्रसाद पिंगळे व रवींद्र काकडे यांना संधी दिली आहे. कालावधी संपल्याने काकडे यांनी नुकताच राजीनामा दिला आहे. आता या पदासाठी शहर भाजप व्यापारी आघाडीचे अध्यक्ष भूषण मुथा, रवींद्र म्हाळसकर, शेखर वहिले, शंकर भोंडवे आदी इच्छुक असून, पक्षाच्या कार्ड कमिटीची बैठक घेऊन नाव निश्चित केले जाईल, अशी माहिती शहराध्यक्ष अनंता कुडे यांनी दिली. बुधवारी (ता. २३) जिल्हाधिकारी कार्यालयात नामनिर्देशन अर्ज दाखल करण्यात येणार असून, गुरुवारी पीठासन अधिकारी नगराध्यक्ष मयूर ढोरे यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत निवड प्रक्रिया होणार आहे, असे कुडे यांनी सांगितले.

रवींद्र काकडे यांचा राजीनामा
पिंपरी चिंचवड शहरात कोरोना संसर्ग झालेले ४७ नवीन रुग्ण

नायजेरीयातून आलेल्या चार जणांसह त्यांच्या संपर्कातील सहा अशा १० जणांना ओमिक्रॉन संसर्ग झाल्याचे आढळले होते. त्यामुळे महापालिकेने परदेशातून आलेल्या प्रवाशांसह त्यांच्या संपर्कातील व्यक्तींचे सर्वेक्षण करून त्यांची कोरोना व ओमिक्रॉन तपासणी केली जात आहे. आजपर्यंत तपासणी अहवाल प्राप्त झालेल्या ७२८ पैकी परदेशातून आलेले १९ व त्यांच्या संपर्कातील २१ असे ४० जण कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. रविवारी (ता. १९) पॉझिटिव्ह अढळलेली व्यक्ती शहराबाहेरील आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com